शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

'होम' सिटी हवी की 'स्मार्ट' सिटी

By admin | Updated: September 8, 2015 00:30 IST

होम, होमटाउन, होम सिटी, होम स्टेट, होम नेशन ही वैश्विक संकल्पना आहे. या सगळ्यांत होम/घर ही एक संकल्पना अंतर्भूत आहे.

कोकणाचं निकटचं सान्निध्य लाभलेलं ‘कोल्हापूर’ हे सामााजिक, आर्थिक, नैसर्गिक अशा सर्वच बाबतीत एक संपन्न शहर. फार छोटे नाही की फार मोठेही नाही. शहराचा प्रत्येक नागरिक स्वास्थ्यपूर्ण, संपन्न जीवन जगत आहे. पुणे-मुंबईसारखी दगदग नाही. एकेकाळी ‘कलापूर’ म्हणून ओळख असलेल्या या शहरात सध्या साधारणत: ४५० आर्किटेक्टस कार्यरत आहेत. साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रांत विकासासाठी पूरक वातावरण आहे. कसलीच कमतरता नसलेल्या या शहरानं स्वत:च्या बळावर विकसित व्हायला पाहिजे. स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली पाहिजे. तेवढी क्षमता कोल्हापुरात आहे. कमतरता आहे ती या क्षमतांची जाणीव असलेल्या प्रामाणिक नेतृत्वाची.‘स्मार्ट सिटी’ बनवायचा अट्टहास करण्यापेक्षा गुणात्मक दर्जा असलेली समाधानी सिटी ‘कोल्हापूर’ कशी बनविता येईल, याचा विचार नियोजनकर्त्यांसहीत सर्व नागरिकांनी करणे गरजेचे आहे. हे शक्य आहे. फक्त कल्पकतेची आणि प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. होम, होमटाउन, होम सिटी, होम स्टेट, होम नेशन ही वैश्विक संकल्पना आहे. या सगळ्यांत होम/घर ही एक संकल्पना अंतर्भूत आहे. प्रत्येक नागरिकाला आपलं गाव, आपलं शहर, आपलं घर वाटलं पाहिजे. त्याला आपल्या होम सिटीमध्ये स्वास्थ्याने, समाधानाने उन्नत जीवन जगता आले पाहिजे. हे कोणी पालिकेचे आयुक्त, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार करू शकणार नाही. स्थानिकांनीच याबाबत व्यापक दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपली उन्नती आयुक्तांसारख्या सरकारी नोकराने, राज्य सरकार, केंद्र सरकारने करावी हा आशावाद लाचार आणि गुलामी वृत्तीचा आहे. जोपर्यंत शहराचे नागरिक विकास प्रक्रियेत जबाबदारीने भाग घेणार नाहीत, तोपर्यंत शहरं खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ होणार नाहीत. झालीच तर सरकारच्या दारात कटोरा घेऊन उभारलेली लाचार शहरं होतील.एकदा आर्किटेक्ट्स आणि इंजिनिअर्स असोसिएशनने आयोजित चर्चासत्रात महापौर व्यासपीठावरून आयुक्तांना विनवीत होते, ‘साहेब थांबा. आमच्या शहराचा विकास करा.’ कीव आली महापौरांच्या भाबडेपणाची. शहर विकासाचे धोरणात्मक निर्णय जर सरकारी नोकर घेणार असतील तर कशाला पाहिजेत महापौर आणि नगरसेवक?अजूनही बरेचसे भाबडे महापौर, नगरसेवक, सर्वसामान्य लोक आयुक्तांना मसिहा (उद्धारकर्ता) समजतात. बहुसंख्य आयुक्तही लॉर्ड माउंटबॅटनच्या तोऱ्यात वागत असतात. प्रत्येक आयुक्तांची जडणघडण निराळी, वैचारिक बैठक निराळी, शिक्षण निराळं. अशा आयुक्तांच्या लहरीनुसार शहरं आकार घेत आहेत. स्वत:चे अस्तित्व, स्वत:ची ओळख गमावून शहरं बिनचेहऱ्याची होत चालली आहेत. शहरांची जडणघडण सरकारी अधिकाऱ्यांच्या लहरीनुसार होऊ नये. त्यात स्थानिक लोकांच्या कल्पना, इच्छा-आकांक्षा प्रतिबिंबित व्हाव्यात, अशी शहरांच्या विकासाबाबत मार्गदर्शक तत्त्वे आहेत. याबाबत लोकांनीही जागरूक असणं गरजेचे आहे. विशेषत: लोकप्रतिनिधींनी याबाबत संवेदनशील असणं गरजेचं आहे.महाराष्ट्रात शहरीकरणाची प्रक्रिया झपाट्याने घडत आहे. विशेषत: गेल्या १५ वर्षांत शहरीकरणाची प्रक्रिया झपाट्याने घडत असून हा वेग अचंबित करणारा आहे. औद्योगीकरण आणि सेवाक्षेत्राला गती मिळाल्यामुळे हा वेग लक्षणीय ठरला आहे. वाढतं शहरीकरण हे राज्याच्या आर्थिक विकासाचं प्रतीक जरी मानलं जात असलं तरी शहरांची अनियंत्रित, अनियोजित, अस्ताव्यस्त वाढ हा चिंतेचा विषय आहे.नगरांचे विकास आराखडे तयार करण्याची सरकारी परंपरा महाराष्ट्रात १९६६ पासून अस्तित्वात आहे. हे आराखडे केवळ जमीन वापराचे आराखडे आहेत. त्यात नगरांचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, विकासाइतकाच भौगोलिक, नैसर्गिक रचनेचाही फारसा विचार केल्याचे आढळत नाही. पाणी, सांडपाणी, रस्ते, वाहतूक, त्यातील गुंतवणूक यांची नगररचनेच्या आराखड्याशी सांगड असावी लागते; पण त्यांना एकत्रित करणारी कोणतीच संस्था नाही. मेंदूच्या नियंत्रणाशिवाय प्रत्येक अवयव जर स्वतंत्रपणे काम करायला लागला तर काय होईल? तीच अवस्था आपल्या शहराची होत चालली आहे. जगातील सर्व नगरांमध्ये असं नियंत्रणाचं काम प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे लोकांनी निवडून दिलेल्या महापौरांचं असते. आपल्या महापौरांची ही कुवत आहे का? नगरांचे व्यापक हित समजून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, आहे का?आधुनिक काळातील नगरांचे आर्थिक आणि सामाजिक नियोजनाबाबत राजकीय अज्ञान आहे. प्रत्येक नागरिकाने हा विषय समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेमका विकास म्हणजे काय? झगमगाट, लाइटिंग, पेव्हिंग म्हणजेच विकास काय? यासाठी विशेषत: आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्सनी वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीच्या भावनेने प्रयत्न केले पाहिजे. नागरी विकासाचं सैद्धान्तिक ज्ञान, नागरी अर्थशास्त्र, समाजशास्त्र, पायाभूत सेवांचं तंत्रज्ञान, व्यवस्थापन तंत्र जपणाऱ्या लोकप्रतिनिधींची गरज आहे. सध्या महापालिकेच्या निवडणुकीचे वातावरण तयार होत आहे. आपल्याला आपले प्रतिनिधी ( नगरसेवक ) निवडून ‘कोल्हापूर’च्या भवितव्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायची आहे.कोल्हापूरकरांचे जीवनमान त्यांनी उंचवावयाचे आहे, याचं भान मतदारांना आहे का? याचं भान प्रतिनिधित्व करू इच्छिणाऱ्यांना तरी आहे का? उमेदवार प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक लढवीत आहेत की सत्तेसाठी? आपण आपले प्रतिनिधी निवडतो, सत्ताधीश निवडतो की कमिशन एजंट निवडतो? अशा बऱ्याच प्रश्नांचं चिंतन, मनन आणि चर्चा होणं गरजेचं आहे.नुकतीच भारतातील ४७६ शहरांची पाहणी ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत करण्यात आली. या पाहणीत पहिल्या दहा शहरांत महाराष्ट्रातील फक्त एका शहराचा (नवी मुंबईचा) समावेश आहे. आपल्या शेजारील कर्नाटक राज्यातील चार शहरांचा आणि केरळमधील तीन शहरांचा देशपातळीवरील पहिल्या दहा स्वच्छ शहरांत समावेश आहे. सर्वाधिक शहरीकरण झालेल्या महाराष्ट्राची ही अवस्था विचार करायला लावणारी आहे. सामान्य बुद्धी आणि सामान्य कर्तृत्व असलेल्या राज्यकर्त्यांमुळे ही महाराष्ट्राची अशी अवस्था आहे.