शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीजबिलांची जुना बुधवार पेठेत होळी, मुंडण करून महावितरणचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 19:16 IST

महावितरण कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांची शुक्रवारी शिवसेनेतर्फे जुना बुधवार पेठेत होळी करण्यात आली. वाढीव दिलेली बिले कमी करावीत अथवा बिलात ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ठळक मुद्देवाढीव वीजबिलांची जुना बुधवार पेठेत होळी५० टक्के सवलत द्यावी; कनेक्शन तोडल्यास टाळे ठोकणार

कोल्हापूर : महावितरण कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांची शुक्रवारी शिवसेनेतर्फे जुना बुधवार पेठेत होळी करण्यात आली. वाढीव दिलेली बिले कमी करावीत अथवा बिलात ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.ग्राहकांच्या शंकांचे निरसन झाल्याशिवाय वीज बिल भरणार नाही; त्यामुळे जर वीज कनेक्शन बंद केले तर महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला.महावितरण कार्यालयाकडून तीन महिन्यांचे एकत्रित बिल भरमसाट वाढून आलेले आहे. सरासरीपेक्षा दुप्पट बिल आकारणी झाल्यामुळे ग्राहकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या बुधवार पेठ शाखेतर्फे शुक्रवारी दुपारी जुना बुधवार पेठ तालीमसमोर निदर्शने करण्यात आली. वाढीव बिलांची होळी करण्यात आली; तसेच मुंडण करून महावितरणचा निषेध करण्यात आला.कोरोना महामारीमुळे मीटर वाचन बंद होते. वीज बिल वितरण केंद्र बंद होते. अशा वेळी सरासरी रीडिंग घेणे आवश्यक होते. तीन महिन्यांचे बिल पाच हजारांपेक्षा जास्त असल्यामुळे ग्राहकांना ते एकाच वेळी भरणे अशक्य आहे. त्यामुळे ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.आंदोलनाचे नेतृत्व शाखाप्रमुख कपिल नाळे, उदय भोसले, किशोर घाटगे, राहुल घाटगे, कल्पेश नाळे, सचिन क्षीरसागर, नीलेश हंकारे, विनायक नाईक, विनोद हजारे, शफीक शेख, किरण होगाडे यांनी केले.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर