शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Holi 2018 कोल्हापूर : सव्वातीन लाख शेणी स्मशानभुमीला दान, विधायक होळीस विविध मंडळांचा उत्स्फुर्त पाठींबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 14:03 IST

होळीच्या निमित्ताने काही मंडळांनी कोल्हापूर येथील पंचगंगा मुक्तीधाम स्मशानभुमीस १ लाख ८० हजार शेणी दान केल्या तर सानेगुरुजी वसाहत परिसरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे रविवारी १ लाख ५० हजार शेणी दान केल्या जाणार आहेत.

ठळक मुद्दे सव्वातीन लाख शेणी स्मशानभुमीला दानविधायक होळीस विविध मंडळांचा उत्स्फुर्त पाठींबा

कोल्हापूर : पर्यावरणाची हानी टाळत विधायक होळी साजरी करण्याकडे शहरातील सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांचा ओढा वाढत चालला असून गुरुवारी साजरी झालेल्या होळीच्या निमित्ताने काही मंडळांनी येथील पंचगंगा मुक्तीधाम स्मशानभुमीस १ लाख ८० हजार शेणी दान केल्या तर सानेगुरुजी वसाहत परिसरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे रविवारी १ लाख ५० हजार शेणी दान केल्या जाणार आहेत. दिवसे दिवस शेणी दान उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दान झालेल्या शेणींच्या आकडेवारीवरुन दिसत आहे.पाण्याचे तसेच हवेचे प्रदुषण टाळले जावे म्हणून कोल्हापूर परिसरात गेल्या काही वर्षापासून एक सामाजिक चळवळ सुरु झाली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकेकाळी गणपती मूर्ती दान उपक्रमास विरोध होत होता, परंतु जसे पाण्याच्या प्रदुषणाचे महत्व पटायला लागले तसे नागरीकांकडूनच उत्स्फुर्त प्रतिसाद मिळायला लागला.

होळीच्या बाबतीतही अशीच परिस्थिती होती. होळीमुळे सार्वजनिक रस्ते खराब होत असत शिवाय हवेचेही मोठ्या प्रमाणात प्रदुषण होऊ लागले आहे. या गोष्टीचेही महत्व पटल्यानंतर नागरीक, शहरातील मंडळांचे कार्यकर्ते होळीला जमलेल्या शेणी स्मशानभूमीस दान करु लागले.महानगरपालिका प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांचा सकारात्मक संदेश समाजात पोहचला असल्याचे स्मशानभूमीकडे दान झालेल्या शेणींच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. गुरुवारी दिवसभर शहरातील अनेक मंडळांचे कार्यकर्ते, नागरीक शेणी घेऊन स्मशानभूमीकडे जाताना दिसत होते.

एका दिवसात १ लाख ८० हजाराहून अधिक शेणी जमा झाल्याचे स्मशानभूमी अधीक्षक अरविंद कांबळे यांनी सांगितले. सानेगुरुजी परिसरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीमार्फत रविवारी १ लाख ५० हजार शेणी दान म्हणून दिल्या जाणार आहेत.शहरातील असंख्य मंडळांनी तसेच नागरीकांनी शेणी दान केल्या आहेत. त्यामध्ये १०० पासून ५०० पर्यंत शेणी दान करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांनी किती शेणी दान केल्या यापेक्षा पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत उचललेला ‘खारीचा वाटा’ अतिशय महत्वाचा आहे. सध्या मिळत असलेला प्रतिसाद पाहता नजिकच्या काळात पर्यावरणपूरक होळी तसेच सामाजिक चळवळ म्हणून नागरीक या उपक्रमाकडे पाहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.शेणी दान करणाऱ्या मंडळांची नावे -

  1. - अचानक तरुण मंडळ - ५१ हजार
  2. - मानसिंग पाटील युवामंच - ५१ हजार
  3. - सम्राट फे्रंडस् सर्कल - ११ हजार १११
  4. - कृष्णा अंगण मित्र मंडळ - १० हजार
  5. - सरदार तालीम मंडळ - १० हजार
  6. -लक्ष्मी गल्ली तरुण मंडळ - ७ हजार
  7. - लक्षतिर्थ विकास फौंडेशन - ५ हजार
  8. -स्वप्नील लाड फौडेशन - ५ हजार
  9. - दिगंबर लक्ष्मण सोनटक्के - ५ हजार

 

 

टॅग्स :Holi 2018होळी २०१८kolhapurकोल्हापूर