शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्दसाठी ‘पीपल्स’ रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 16:45 IST

केंद्र सरकारने मंजूर केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा, या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘रद्द करा...रद्द करा..., नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा...’अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्दे नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्दसाठी ‘पीपल्स’चे धरणे आंदोलन‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा...’च्या घोषणांनी परिसर दणाणला

कोल्हापूर : केंद्र सरकारने मंजूर केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा, या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘रद्द करा...रद्द करा..., नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा...’अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर व प्रदेश सदस्य नंदकुमार गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केले. यावेळी कार्यकर्त्यांनी या कायद्याला विरोधासाठी जोरदार घोषणाबाजी केली.या ठिकाणी ‘भाकप’चे नेते दिलीप पवार, ‘माकप’चे चंद्रकांत यादव, लाल निशान पक्षाचे अतुल दिघे, कॉँग्रेसचे अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, राष्ट्रवादीचे अ‍ॅड. अशोकराव साळोखे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, आदी मान्यवरांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.दगडू भास्कर, नंदकुमार गोंधळी, वसंतराव मुळीक, चंद्रकांत यादव, अशोकराव साळोखे, अतुल दिघे, सोमनाथ घोडेराव, आदींनी आपल्या भाषणातून केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात टीका केली. जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, लोकसभा व राज्यसभेत मंजूर करण्यात आलेला हा कायदा देशहिताचा नाही. यामुळे जनतेमध्ये दुही निर्माण होणार आहे. या जुलमी कायद्याने दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समाजाचे जीवन उद्ध्वस्त करणारा आहे. देशाने राज्यघटनेची तत्त्वप्रणाली स्वीकारली असताना धर्मावर आधारित व्यवस्था निर्माण करणे म्हणजे पुन्हा एकदा देश फाळणीकडे नेण्याचा भाजप सरकार प्रयत्न करीत आहे.आंदोलनात रमेश पाचगावकर, अब्बास शेख, जयसिंग कांबळे, आनंदा कांबळे, जितेंद्र कांबळे, निवास सडोलीकर, रतन कांबळे, विलास भास्कर, शिवाजी कांबळे, वाय. के. कांबळे, माधुरी कांबळे, मच्छिंद्र राजशिल, आदी सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीMorchaमोर्चाkolhapurकोल्हापूर