शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लोककलेच्या अभ्यासकांसमोर उलगडला पोवाड्याचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 11:58 IST

culture Mumbai University Kolhapur : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यशाळेत कोल्हापुरातील शिवशाहीर डॉ. राजू राऊत यांनी पोवाड्याचा इतिहास सांगून आकृतिबंधाची मांडणी केली. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या लोककलेच्या अभ्यासकांनी या मांडणीला उत्स्फूर्तपणे दाद दिली.

ठळक मुद्देलोककलेच्या अभ्यासकांसमोर उलगडला पोवाड्याचा इतिहास मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन कार्यशाळेत शाहीर राजू राऊत यांचे मार्गदर्शन

कोल्हापूर : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यशाळेत कोल्हापुरातील शिवशाहीर डॉ. राजू राऊत यांनी पोवाड्याचा इतिहास सांगून आकृतिबंधाची मांडणी केली. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या लोककलेच्या अभ्यासकांनी या मांडणीला उत्स्फूर्तपणे दाद दिली.मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासनामार्फत घेण्यात आलेल्या या ऑनलाईन कार्यशाळेत पोवाड्याचा आकृतिबंध या विषयावर कोल्हापुरातील शिवशाहीर राजू राऊत यांनी मार्गदर्शन केले. राऊत हे शाहिरीचे अभ्यासक असून, या विषयातील डॉक्टरेट त्यांनी संपादन केलेली आहे.सुमारे दोन तास रंगलेल्या या व्याख्यानात राऊत यांनी अकराव्या शतकातील शाहिरीपासून वर्तमानातील शाहिरीपर्यंतचा रंजक प्रवास पोवाड्यांच्या सादरीकरणासह सांगितला. शाहिरीचा जागतिक प्रवास, त्याचे विविध प्रकार याची माहिती राऊत यांनी विविध कवने इतिहासाचे दाखले देत मांडल्यामुळे या कार्यशाळेतील हे सत्र उद्बोधक आणि प्रवाही झाले होते. या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये राज्यातील लोककलेचे अभ्यासक सहभागी झाले होते.शिवकाळातील शाहिरी, ब्रिटिश काळातील शाहिरी, शाहू काळातील शाहिरीपासून वर्तमान काळातील सामाजिक विषयांची मांडणी करणारी परिवर्तनवादी, प्रबोधनात्मक शाहिरीपर्यंतचा मोठा कालखंड राऊत यांनी ओघवत्या भाषेत मांडला. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकMumbai Universityमुंबई विद्यापीठonlineऑनलाइनkolhapurकोल्हापूर