शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

‘अक्षरगप्पा’मध्ये उलगडला राष्ट्रप्रतीकांचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 10:23 IST

राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राष्ट्रध्वज, प्रतिज्ञा आणि राजमुद्रा या भारतीय राष्ट्रप्रतीकांचा इतिहास  उलगडण्यात आला. ‘अक्षरगप्पां’च्या १०३ व्या भागामध्ये पुणे येथील मिलिंद सबनीस यांनी अतिशय विस्ताराने या प्रतीकांच्या निर्मितीमागील अनेक कहाण्या यावेळी विशद केल्या.

ठळक मुद्देसुभाषबाबूंचे ‘मार्च पास’, रवींद्रनाथ टागोरांचे गायन‘अक्षरगप्पा’मध्ये उलगडला राष्ट्रप्रतीकांचा इतिहास

कोल्हापूर : राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राष्ट्रध्वज, प्रतिज्ञा आणि राजमुद्रा या भारतीय राष्ट्रप्रतीकांचा इतिहास  उलगडण्यात आला. ‘अक्षरगप्पां’च्या १०३ व्या भागामध्ये पुणे येथील मिलिंद सबनीस यांनी अतिशय विस्ताराने या प्रतीकांच्या निर्मितीमागील अनेक कहाण्या यावेळी विशद केल्या.‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमामध्ये सबनीस म्हणाले, ‘जन गण मन’ हे गीत पंचम जॉर्जच्या स्तुतिपर लिहिल्याचा आक्षेप घेतला जातो; परंतु अशा प्रकारचे स्तुतिपर गीत लिहिण्यासाठी टागोर यांनी नकार दिला होता; मात्र यानिमित्ताने जी परिषद झाली, त्यासाठी त्यांनी हे गीत लिहिले होते. जॉर्ज यांच्या स्वागतासाठीचे गीत अन्य कवींकडून लिहून घेण्यात आले होते. याबाबत टागोर यांनीच खुलासा केला होता.सारनाथच्या गांधारशैलीतील शिल्पस्तंभावरून तीन मुद्रांचा सिंह अशी आपली राजमुद्रा तयार करण्यात आली. या मुद्रेवर ‘सत्यमेव जयते’ हे शब्द असावेत, यासाठी आंध्रप्रदेशातील सी. व्ही. वारद यांनी भारत सरकारशी ३० वर्षे लढा दिला. यानंतर हे शब्द वापरण्याचे मान्य करण्यात आले. आंध्रप्रदेशातीलच निसर्गोपचार तज्ज्ञ, लेखक पॅडेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये आपल्या शाळेतील मुलांसाठी तेलुगू भाषेत पहिल्यांदा प्रतिज्ञा लिहिली. नंतर ती सर्व देशभर मान्यता पावली.भारतीय संस्कृतीमध्ये ध्वजाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगून सबनीस म्हणाले, १८५७ सालच्या बंडावेळी जो ध्वज तयार करण्यात आला होता, त्यामध्ये भाकरी आणि कमळ या चिन्हांचा वापर करण्यात आला होता. देशासाठी पहिला ध्वज तयार करण्याची कामगिरी मूळच्या विदेशातील असलेल्या भगिनी निवेदिता यांनी करून दाखविली. सभोवती असलेल्या १०८ ज्योती आणि त्यामध्ये इंद्राचे अस्त्र दाखवून त्यावर ‘वंदे मातरम्’ लिहिण्यात आले होते.ऋषी बंकिमचंद्र चटर्जी यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपले राष्ट्रगीत ठरले नव्हते; त्यामुळे १४ आॅगस्टच्या मध्यरात्री ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’ ही दोन्ही गीते गाइली गेली. रवींद्रनाथ टागोर यांच्यापासून ए. आर. रेहमान, अजय-अतुल यांच्यापर्यंत अनेकांनी ‘वंदे मातरम्’ला नवनवीन चाली लावत त्याचे सादरीकरण केले आहे. असे भाग्य केवळ ‘वंदे मातरम्’ या गीताला मिळाले. या गीतासाठी बंगालमधील मान्यवरांनी जितके योगदान दिले, त्यापेक्षा अधिक योगदान मराठी माणसांनी दिले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे ‘मार्च साँग’ म्हणून हे गीत म्हटले जाई, अशी माहिती सबनीस यांनी दिली. यावेळी सुभाषचंद्र बोस यांची चित्रफीत आणि टागोर यांनी गाइलेले ‘वंदे मातरम्’ ऐकायला मिळाल्याने श्रोते भारावून गेले. रवींद्र जोशी यांनी स्वागत केले, तर समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूरची आठवणसबनीस म्हणाले, कोल्हापूरचे अल्लादिया खाँ यांचे चिरंजीव बुर्जी खाँसाहेब यांनी ‘वंदे मातरम्’ गीत नव्याने बसविण्यासाठी घेतले होते; मात्र याच दरम्यान त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांचे हे काम अपूर्ण राहिले.

 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर