कोल्हापूर : १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातील कोल्हापूरचे क्रांतिवीर छत्रपती श्रीमंत चिमासाहेब महाराज यांचा इतिहास सविस्तरपणे पाठ्यपुस्तकात येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रणजित गावडे यांनी केले. जिल्हा बार असोसिएशन, हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था यांच्यावतीने चिमासाहेब महाराज यांच्या १९० व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला टाऊन हॉल बाग येथील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मागणीचे निवेदन देण्याचा निर्णय झाला.
हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष रामेश्वर पत्की यांनी चिमासाहेब महाराज यांच्या कार्याची माहिती दिली. ‘अमर रहे, अमर रहे चिमासाहेब अमर रहे’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ॲड. गुरुप्रसाद माळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हुतात्मा क्रांती संस्थेचे किसन कल्याणकर, ॲड. जयेंद्र पाटील, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, राहुल चौधरी, ॲड. वैभव काळे, महादेवराज जाधव, सुनील हंकारे आदी उपस्थित होते.
फोटो : ०७०१२०२० कोल चिमासाहेब महाराज
ओळी : छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरातील टाऊन हॉल बागेतील त्यांच्या पुतळ्यास हुतात्मा क्रांती संस्था आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.