शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

होडावडे गावाला ऐतिहासिक महत्त्व

By admin | Updated: April 28, 2015 00:27 IST

मोहन नाईक : पर्यटन महोत्सवाचा थाटात प्रारंभ

तळवडे : होडावडे गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या गावाची महती सावंतवाडी संस्थानशी निगडित आहे. अशा गावाने वेगवेगळे उपक्रम राबविणे गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन होडावडे ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष मोहन नाईक यांनी होडावडे गावातील रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे आयोजित केलेल्या होडावडे नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले. होडावडे येथील रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे होडावडे जिल्हा परिषद केंद्रशाळा क्र. १ च्या भव्य पटांगणावर होडावडे पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन ग्रामोन्नती मंडळ मुंबईचे अध्यक्ष मोहन गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर होडावडे सरपंच राजबा सावंत, होडावडे श्री देव क्षेत्रपालेश्वर पतपेढी मुंबई अध्यक्ष विजय गावडे, वेंगुर्ले तालुका काँगे्रस अध्यक्ष मनीष दळवी, होडावडे ग्रामोन्नती मंडळाचे खजिनदार उल्हास केरकर, होडावडे विकास सेवा सोसायटी अध्यक्ष मनोहर नाईक, सावंतवाडी रिक्षा संघटना अध्यक्ष भाऊ पाटील, रिक्षा संघटना जिल्हा पदाधिकारी सुधीर पराडकर, व्यापारी आनंद काजरेकर, सुरेश मेस्त्री, शाम पेडणेकर, पेंडूर सरपंच संतोष गावडे, होडावडे रिक्षा संघटना अध्यक्ष सुभाष दळवी, भास्कर साळगावकर, सप्तरंग कलामंच उमेश पावणोजी, रामचंद्र कुडाळकर, रिक्षा संघटना सचिव प्रसाद परब व अन्य मान्यवर उपस्थित होते. होडावडे गावातील रिक्षा संघटनेचा विचार करता, ही संघटना नव्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात उभारी घेत आहे. याबाबत उपस्थितांनी संघटनेचे कौतुक केले. दीपावली उत्सवानंतर होडावडे दशावतार नाट्यमहोत्सवाचे आयोजन मंडळाने केले आहे. या नाट्यमहोत्सवात होडावडे गावातील सप्तरंग कलामंचच्या कलाकारांनी सादर केलेला श्री स्वामी समर्थ दिंडी देखावा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. होडावडे बाजारपेठेतून सुरू करण्यात आलेल्या या देखाव्याचा समारोप महोत्सवस्थळी करण्यात आला. या चित्ररथात मान्यवरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभाग घेतला. रिक्षा संघटनेचे कौतुकहोडावडे गावात रिक्षा संघटनेने हा आगळावेगळा उपक्रम राबवून स्थानिक दशावतार कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. रिक्षा संघटेनेचे पदाधिकारी आणि सदस्य मिळून केवळ १४ जणांनी एकत्र येऊन महोत्सवाचे यशस्वीपणे आयोजन केले. यात रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुभाष दळवी, सचिव प्रसाद परब, उपाध्यक्ष किशोर होडावडेकर, राजन केळूसकर, सचिन कोंडये, हनुमंत आमडोसकर, प्रमोद दळवी, मोहन दळवी, संतोष गोसावी, गोट्या पेडणेकर, विजय होडावडेकर, विद्याधर दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.