शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

अंबाबाई मंदिर परिसरातील ऐतिहासिक कठडा ढासळला

By admin | Updated: March 24, 2015 00:12 IST

पुरातत्त्व खाते कधी गंभीर ?

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या आवारातील रामाचा पार या वडाच्या झाडाखालील कठड्याची एक बाजू रविवारी रात्री ढासळली. अंबाबाई मंदिराच्या उत्तर दरवाजा येथील रामाचा पार नाव असलेल्या या कठड्याला धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी हजारो सुवासिनी परंपरागतरीत्या येथील वडाच्या झाडाची पूजा करतात. शिवाय येथे पूर्वी अनेक धार्मिक प्रवचने, सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. अंबाबाई मंदिरातील या रामाच्या पाराची वेगळी ओळख आणि परंपरा आहे. हा पार वडाच्या झाडाभोवती बांधण्यात आला आहे. त्यामुळे झाडाची मुळे आणि पारंब्या यामुळे कठडा ठिसूळ झाला आहे. त्यामुळेच त्याची एक बाजू कोसळली. कठडा कोसळल्याचे कळताच परिसरातील भाविकांनी देवस्थान समितीच्या कार्यालयात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली व लवकरात लवकर कठड्याची पूर्ववत बांधणी केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पुरातत्त्व खाते कधी गंभीर ?अंबाबाई मंदिराचे हेमाडपंथी दगडी बांधकामाची अडत काही ठिकाणी निघाली आहे, काही ठिकाणी पक्ष्यांनी घरे केली आहेत, झाडांची मुळे उगवली आहेत. पुरातत्त्व खात्याकडून मंदिराचे जतन करणे तसेच मंदिराच्या डागडुजीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कठड्याची माहिती विचारली असता व्यवस्थापक धनाजी जाधव यांनीही आम्ही वर्षभरापूर्वीच पुरातत्त्व खात्याला याबाबतची माहिती देऊन कठडा पुन्हा बांधणे गरजेचे असल्याचे कळवले आहे, असे सांगितले. मात्र, पुरातत्त्व खात्याने व देवस्थान समितीनेदेखील याची दखलच न घेतल्याचा परिणाम म्हणून कठडा ढासळला.