शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

चिकोत्राच्या पाणीसाठ्यासाठी हिरण्यकेशीचा पर्याय - चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 05:03 IST

आजरा तालुक्यातील आंबेओहळ, चिकोत्रा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यास हिरण्यकेशी नदीचा पर्याय शासनाच्या विचाराधीन असून, याबाबत निधीची तरतूद करू, आराखडा तयार करा अशा सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना केली.

उत्तूर : आजरा तालुक्यातील आंबेओहळ, चिकोत्रा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यास हिरण्यकेशी नदीचा पर्याय शासनाच्या विचाराधीन असून, याबाबत निधीची तरतूद करू, आराखडा तयार करा अशा सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना केली. वडकशिवाले (ता. आजरा) येथे विजयी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी घाटगे होते.पालकमंत्री पाटील यांच्या स्वागताची तयारी ग्रामस्थांनी जोरदार केली. पालकमंत्री यांच्या हस्ते खडीकरण-डांबरीकरणाचा प्रारंभ झाला. २० वर्षांनंतर सत्तांतर झाल्यामुळे गाव भाजपामय झाले होते.पाटील म्हणाले, वडकशिवाले गावाने इतके परिवर्तन केले आहे की, आमदार हसन मुश्रीफ यांना हा पराभव जिव्हारी लागला आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात परिवर्तन झाले ही कौतुकाची बाब आहे.वडकशिवालेकरांनी गावतलावाचा गाळ श्रमदानातून काढून घ्यावा, अधिक पाणीसाठा झाल्यास त्याचा वापर शेतीसाठी करावा, शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारा निधी देतो. आंबेओहळ, चिकोत्रात पाणीसाठ्याची गरज ओळखून आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आर्दाळ-हालेवाडी-वडकशिवाले या ग्रामीण रस्त्यास मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजुरी मिळाली असून, या कामास सुरुवात होणार आहे.‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, २० वर्षांत गावचा विकास न झाल्याने परिवर्तन झाले आहे. फाउंडेशनतर्फे ‘जलयुक्त शिवार’ राबवा असे आवाहन केले. आंबेओहळ, चिकोत्रातील पाणीसाठा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.आजरा कारखाना अध्यक्ष अशोक चराटी म्हणाले, आजरा तालुका भाजपामय झाला आहे. ३६ पैकी २२ ग्रामपंचायतींवर भाजपाचे कमळ फुलले आहे. सूतगिरणीसाठी सात कोटी बिनव्याजी, तर दोन कोटी २१ लाख शासनाने माफ केले आहे. त्यामुळे सूतगिरणीस चांगले दिवस आले आहेत.आपल्या विजयाबाबत बोलताना सरपंच संतोष बेलवाडे म्हणाले, दीड वर्षात आम्ही विकासकामे घेऊन जनतेसमोर गेलो. गावाने आम्हाला निवडून दिले आहे. आम्ही सारे एकदिलाने काम करूया यासाठी साथ द्या.केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे स्वीय साहाय्यक प्रकाश बेलवाडे यांनी परिसरातील विविध गावच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसचे तसेच धरणग्रस्तांच्या जमिनींचे वाटप करण्यात आले.दादांनी घेतली ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल‘हिरण्यकेशीतून आंबेओहळ चिकोत्रासाठी पाणी योजना करा’ अशा आशयाचे ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी कागलच्या मेळाव्यात पाणीसाठ्यासंदर्भात चर्चा केली होती. ‘लोकमत’चे वृत्त चंद्रकांतदादांनी आवर्जून वाचन केले. याबाबत त्यांनी घाटगे यांच्याशी चर्चा केली.हारतुरेऐवजी गुलाबपुष्प : वडकशिवालेत विजयी मेळावा दिमाखात साजरा केला. पण, कोणत्याही नेत्यांना, पदाधिकारी यांचे स्वागत व सत्कार शाल, श्रीफळ व हार न नेता केवळ गुलाबपुष्प देऊन करण्यात येत होते याची कार्यक्रमस्थळी चर्चा झाली. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार