शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

कोल्हापूरच्या स्वप्निलने बनविला हिरकणीचा स्टोरी बोर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:06 IST

अल्पावधीतच रसिकप्रिय झालेल्या मराठी ‘हिरकणी’ या सिनेमाचा स्टोरीबोर्ड कोल्हापूरचा चित्रकार कलावंत स्वप्निल पाटील याने बनविला आहे. त्याने काढलेल्या चित्रांच्या आधारेच सिनेमातील अनेक प्रसंगांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या स्वप्निलने बनविला हिरकणीचा स्टोरी बोर्डकलाकाराचा सन्मान : ‘लोकमत’च्या बातमीने मिळाला नवा चित्रपट

संदीप आडनाईककोल्हापूर : अल्पावधीतच रसिकप्रिय झालेल्या मराठी ‘हिरकणी’ या सिनेमाचा स्टोरीबोर्ड कोल्हापूरचा चित्रकार कलावंत स्वप्निल पाटील याने बनविला आहे. त्याने काढलेल्या चित्रांच्या आधारेच सिनेमातील अनेक प्रसंगांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.मूळचा करवीर तालुक्यातील कसबा आरळे येथील स्वप्निल पाटील याला चित्रकला आणि शिल्पकला प्रदर्शनात आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच मुंबईतील प्रतिष्ठेच्या जहॉँगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर आर्ट गॅलरीसह राज्यातील अनेक ठिकाणी चित्रप्रदर्शनेही भरविलेली आहेत.

याशिवाय स्वप्निलने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक सिनेमांसाठी सहायक कलादिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. काही मराठी सिनेमांसह ‘साजणा’ या मालिकेचे शीर्षक गीत, काही व्यावसायिक जाहिरातींचेही स्टोरी बोर्ड त्याच्या कुंचल्यातून उतरले आहेत.स्वप्निलने ‘हिरकणी’ सिनेमातील छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यातील गाण्यातील प्रसंग, जिथून हिरकणी रायगडाच्या पश्चिम कड्यावरून उतरते तो प्रवास आणि शेवटची लांडग्याशी होणारी लढाई हे प्रसंग ‘फ्रेम टू फ्रेम’ पेन्सिलच्या साहाय्याने रेखाटले.

यासाठी महिनाभर त्याने परिश्रम घेतले. दिग्दर्शक प्रसाद ओक, कला दिग्दर्शक संतोष फुटाणे, कॅमेरामन संजय मेमाणे, फाईट मास्टर अमर शेट्टी यांनी त्याला मार्गदर्शन केले. फुटाणे यांनी तर रायगडावरील कड्याचा हुबेहूब डमी कडा बनविला होता. त्याच्या साहाय्याने स्वप्निलने अनेक प्रसंगांचे स्टोरी बोर्ड रेखाटले.‘लोकमत’मुळे मिळाली संधी‘लोकमत’ने २0१0 मध्ये भरविलेल्या श्लोक प्रदर्शनातून स्वप्निलच्या कारकीर्दीला प्रारंभ झाला. त्याने गतवर्षीच्या केलेल्या ‘तु. का. पाटील’ या सिनेमाच्या स्टोरीबोर्डची बातमी वाचून कला दिग्दर्शक संतोष फुटाणे यांनी हिरकणी सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद ओक यांची भेट घडवून आणली आणि हा सिनेमा मिळाला.असा करतात स्टोरी बोर्डमराठी सिनेमामध्ये अलिकडे रोज नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यामध्ये स्टोरी बोर्डचाही समावेश आहे. प्रामुख्याने अ‍ॅनिमेटेड आणि हॉलिवूड चित्रपटांसाठी स्टोरी बोर्ड सर्रास वापरला जातो. ही संकल्पना जुनी असली तरी, त्याचा काही मोजक्याच सिनेमांमध्ये वापर झाला आहे. स्टोरी बोर्ड म्हणजे दिग्दर्शकाच्या नजरेतून उतरला जाणारा सिनेमा.

कथेतील प्रसंगांची रेखाटने आधीच तयार करून त्याबरहुकूम सिनेमा बनविणे दिग्दर्शकाला सोईचे जाते; यासाठी चित्रकाराकडून ‘फ्रेम टू फ्रेम’ रेखाटने कागदावर काढून घेतली जातात, मग त्यानुसार प्रत्यक्ष चित्रीकरण केले जाते. याचा फायदा दिग्दर्शकासोबतच कलाकार, कॅमेरामन आणि एडिटर यांनाही होतो. यामुळे कमी कालावधीत सिनेमा पूर्ण करता येतो. 

 

टॅग्स :artकलाcultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूरHirkani Marathi Movieहिरकणी