शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग देखभालची ‘हेल्पलाईन’ सलाईनवर !

By admin | Updated: May 7, 2015 00:17 IST

नादुरुस्त वाहनांना ‘स्टेपनी’चा भरवसा : ‘देखभाल’च्या गस्तीची जीप फक्त मृतदेह उचलायला; सुरक्षात्मक उपाययोजना करणार कोण ?

संजय पाटील-कऱ्हाड -महामार्गावर प्रत्येक तीन किलोमीटरच्या अंतरात ‘महामार्ग देखभाल’च्या ‘हेल्पलाईन’ क्रमांकाचे फलक लावले गेलेत. त्याचबरोबर या विभागाची वाहनेही वारंवार हायवेवर गस्त घालीत असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात ही ‘हेल्पलाईन’च ‘सलाईन’वर असल्याची परिस्थिती आहे. अपघात झाला की ‘महामार्ग देखभाल’च्या कर्मचाऱ्यांना पळता भुई थोडी होते; पण अपघात होऊ नये, यासाठी हा विभाग उपाययोजनाच करीत नसल्याचे दिसते.वाहनधारकांना महामार्गावरून प्रवास करताना काही अडचण निर्माण झाल्यास त्यांना त्वरित मदत उपलब्ध व्हावी, यासाठी महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे एक पथक तैनात असते. या ‘हेल्पलाईन’चा मोबाईल क्रमांकही प्रत्येक तीन किलोमीटर अंतरात फलकांवर लिहिण्यात आला आहे. वाहनधारकांनी आवश्यकते वेळी या क्रमांकावर फोन करून मदत मागणे अपेक्षित असते. तसेच महामार्ग देखभालची जीपही महामार्गावर गस्त घालीत असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात वाहनधारक संकटात असतानाही अनेकवेळा त्याला दिवसभर मदत उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. महामार्गावर अचानक वाहन नादुरुस्त झाल्यास संबंधित वाहनाच्या चालकाला मदतीचा गरज असते. तसेच महामार्गावर धोकादायक स्थितीत थांबलेल्या त्या वाहनाच्या व पाठीमागून येणाऱ्या इतर वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षात्मक उपाययोजना करणेही आवश्यक असते. मात्र, महामार्ग देखभालच्या कर्मचाऱ्यांना धोकादायक स्थितीत थांबलेल्या अशा वाहनांचे काहीच सोयरसुतक नसल्याची परिस्थिती आहे. वाहन दिवसभर महामार्गावरच थांबलेले असताना ‘हेल्पलाईन’ची गस्त घालणारी जीप किंवा महामार्ग देखभालचा एकही कर्मचारी त्याकडे फिरकतही नाही, हे दुर्दैव. नादुरुस्त स्थितीत महामार्गावर थांबलेल्या वाहनावर इतर वाहने आदळून भीषण अपघात झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामध्ये काहीजणांना जीव गमवावा लागलाय तर काहीजण जायबंदी झालेत. या अपघातांची भीषणता एवढी असते की, अपघातग्रस्त वाहने तेथून हटवितानाही अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे असे अपघात होऊ नयेत, यासाठी नादुरुस्त वाहनाच्या आसपास सुरक्षात्मक उपाययोजना उभारण्याची जबाबदारी महामार्ग देखभाल विभाग व महामार्ग पोलिसांवर असते. मात्र, हे दोन्ही विभाग नादुरुस्त वाहनांची फिकीरच करीत नसल्याचे दिसते. पोलिसांची मदत ‘झुडपात’महामार्गावर वनवासमाची गावच्या हद्दीत महामार्ग पोलिसांची हेल्पलाईन क्रमांक लिहिलेला फलक उभारण्यात आला आहे. मात्र, हा फलक झुडपाआड गेल्याने दिसूनही येत नाही. परिणामी, एखाद्या वाहनचालकास गरज असल्यास त्याला संबंधित क्रमांक मिळणेही मुश्किल आहे. ‘बॅरिकेट’, ‘सेफ्टी कोन’ उपलब्धवाहनांच्या सुरक्षात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने महामार्ग देखभालकडे बॅरिकेटस् तसेच सेफ्टी कोनही उपलब्ध आहेत. गस्तीच्या जीपमध्ये या उपाययोजना उपलब्ध असतात. मात्र, वापर होतो का, हा संशोधनाचा विषय आहे.तीन जीप, दोन रुग्णवाहिकामहामार्गावर गस्त घालण्यासाठी महामार्ग देखभाल विभागाकडे तीन जीप आहेत. तसेच दोन रुग्णवाहिकाही उपलब्ध आहेत. अपघात झाल्यास या रुग्णवाहिकांचा उपयोग केला जातो. तसेच संबंधित तीन जीपद्वारे दिवसभर महामार्गावर गस्त घालण्यात येत असल्याचे महामार्ग देखभाल विभाग सांगतो.१२६ किलोमीटरचा महामार्गकऱ्हाडला कार्यरत असलेल्या महामार्ग देखभाल विभागाच्या अखत्यारित सुमारे १२६ किलोमीटरचा महामार्ग आहे. या अंतरात मदत पुरविण्याची जबाबदारी येथील कर्मचाऱ्यांवर असते. तीन भागात विभाजनसेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून महामार्ग देखभाल विभागाने हे १२६ किलोमीटर अंतर तीन विभागांमध्ये विभागले असून, त्यामुळे मदत वेळेत पोहोचविता येते, असे या विभागाचे म्हणणे आहे. प्रत्येक भाग ४२ किलोमीटरचाकऱ्हाड ते शेंद्रे हा ४२ किलोमीटरचा एक भाग, कऱ्हाड ते किणी हा ४२ किलोमीटरचा दुसरा तर किणी ते कागल हा ४२ किलोमीटरचा तिसरा भाग आहे. या तीन भागात विभागणी करून महामार्ग देखभाल विभागाकडून मदत पुरविली जाते. सकाळपासून कोणी फिरकलच नाही !वारुंजी फाटा येथे कोल्हापूर-सातारा लेनच्या उड्डाणपुलावर बुधवारी दुपारपर्यंत एक ट्रक नादुरुस्त स्थितीत उभा होता. दुभाजकाशेजारीच अत्यंत धोकादायक स्थितीत थांबलेल्या त्या ट्रकच्या चालकाने स्वत:च ट्रकची स्टेपनी काही अंतरावर ठेवली होती. महामार्गावर पडलेली स्टेपनी पाहून इतर वाहनचालक आपली वाहने नियंत्रित करतील, अशी त्या चालकाला अपेक्षा होती. मात्र, स्टेफनी ठेवून ट्रक दुरुस्त करीत असताना त्याच्यासह ट्रकमधील इतर तिघांचा जीव टांगणीला लागलेला. महामार्ग पोलीस किंवा देखभाल विभागाचे कोणीही सकाळपासून इकडे फिरकलेच नसल्याचे संबंधित ट्रकच्या चालकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.