शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

हाय व्होल्टेज सामन्यात ‘पाटाकडील’ची ‘शिवाजी’ वर मात ; ‘संध्यामठ’ने ‘पोलीस’ला बरोबरीत रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 11:49 IST

के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने तुल्यबळ शिवाजी तरुण मंडळाचा १-० असा पराभव केला; तर कोल्हापूर पोलीस संघ व संध्यामठ तरुण मंडळ

ठळक मुद्दे के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धापाटाकडील-शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी सुमारे दहा हजारांहून अधिक प्रेक्षकांनी यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच गर्दी केली होती.

कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने तुल्यबळ शिवाजी तरुण मंडळाचा १-० असा पराभव केला; तर कोल्हापूर पोलीस संघ व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यातील लढत २-२ अशी बरोबरीत राहिली.

शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पाटाकडील व शिवाजी तरुण मंडळ या दोन पारंपरिक संघांत लढत झाली. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांकडून आक्रमक व वेगवान खेळांचे प्रदर्शन केले गेले. ‘पाटाकडील’कडून जॉन्सन, ओंकार पाटील, वृषभ ढेरे, ओंकार पाटील, सौरभ सालपे ,डेव्हिड इथो यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले; तर ‘शिवाजी’कडून करण चव्हाण-बंदरे, शुभम साळोखे, सुमित घाटगे, सुमित जाधव, तांबा यांनीही तितक्याच तोडीचा खेळ करीत स्पर्धेत चांगलीच रंगत आणली. दोन्ही संघांना प्रेक्षकांतून समर्थन लाभले होते.

पाटाकडील ‘अ’ कडून हृषिकेश मेथे-पाटील, तर ‘शिवाजी’कडून करण चव्हाण-बंदरे यांच्या प्रत्येक चालीचे प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्या वाजवून समर्थन केले. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल न करता आल्याने सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात ‘पाटाकडील’कडून हृषिकेश मेथेच्या पासवर ओंकार पाटीलने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही; तर ‘शिवाजी’कडून केनियन खेळाडू तांबाने मारलेला फटका गोलपोस्टला अडून मागे आला. त्यामुळे ही गोल करण्याची संधी वाया गेली. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सामना बरोबरीत राहील असे फुटबॉल रसिकांना वाटत होते. मात्र, ७४ व्या मिनिटाला अक्षय मेथे-पाटीलने जोरदार मुसंडी मारत गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ‘शिवाजी’कडून सामन्यात बरोबरी साधण्याचे अनेक प्रयत्न झाले; पण यश आले नाही. अखेरीस हा सामना पाटाकडील ‘अ’ने १-० असा जिंकला. सामन्यादरम्यान मैदानात गैरवर्तन करणाऱ्या ‘पाटाकडील’च्या रणजित विचारे या खेळाडूस पंच सुनील पोवार यांनी समज म्हणून यलो कार्ड दाखविले. तत्पूर्वी त्याला खेळामध्ये यलो कार्ड असल्याने नियमानुसार दोन यलो कार्ड झाल्यास रेडकार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले.

संध्यामठ तरुण मंडळाने कोल्हापूर पोलीस संघास २-२ असे बरोबरीत रोखले. कोल्हापूर पोलीस संघाकडून २० व्या मिनिटाला इंद्रजित मोंडलने पहिला गोल नोंदविला; तर २९ व्या मिनिटाला ‘संध्यामठ’कडून रोहित पाटीलने मिळालेल्या संधीवर गोल करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. उत्तरार्धात पुन्हा पोलीस संघाकडून इंद्रजित मोंडलने वैयक्तिक व संघाचा दुसरा गोल नोंदविला. ७० व्या मिनिटाला ‘संध्यामठ’कडून आशिष पाटीलने गोल करीत सामना २-२ असा बरोबरीत आणला. अखेरपर्यंत हीच गोलसंख्या कायम राहिल्याने सामना बरोबरीत सुटला.यांना कोण आवरणार?पाटाकडील-शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी सुमारे दहा हजारांहून अधिक प्रेक्षकांनी यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच गर्दी केली होती. सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरीतून पाण्याचा बाटल्या मैदानात भिरकावण्यात आल्या. तर काही प्रेक्षकांनी थेट खेळाडू व प्रशिक्षक पंचांना अश्लील शिवीगाळ, शेरेबाजी केली. निवेदक आणि पोलिसांनी वारंवार सांगूनही हा प्रकार थांबत नव्हता. त्यामुळे अशा मोजक्याच हुल्लडबाजांना कोण आवर घालणार, असा प्रश्न मैदानात फुटबॉलप्रेमींकडून विचारला जात आहे. 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर