शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
3
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
4
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
5
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
6
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
7
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
8
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
9
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
10
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
11
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
12
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
13
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
14
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
15
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
16
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
17
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
18
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
19
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
20
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स

महामस्तकाभिषेकाचे मानकरी निश्चित

By admin | Updated: January 29, 2015 00:06 IST

बाहुबलीत सोहळा उद्यापासून : बाहुबली आश्रम, बाहुबली विद्यापीठातर्फे महोत्सव

बाहुबली : येथील बाहुबली आश्रम व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बाहुबली महामूर्तीचा सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेक सोहळा शुक्रवार दि. ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंत आयोजित केला आहे. त्यासाठी पायाड उभारणे, मंडप, आदींची व्यवस्था पूर्ण होत झाली असून संपूर्ण सात दिवसांसाठी महामस्तकाभिषेक व विधानाचे मानकरी निश्चित झाले आहेत. त्याचे नियोजन असे - शुक्रवारी (ता. ३०) सकाळी साडेसात वाजता माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष डी. सी. पाटील यांच्या हस्ते महामूर्तीला चरणाभिषेक करून महोत्सवास प्रारंभ होईल.महोत्सवादरम्यान होणाऱ्या विधानाचे मानकरी अनुक्रमे पंचपरमोळी विधान - जिनेंद्र धनपाल चौगुले व सुनीता चौगुले, चौवीस तीर्थंकर विधान सुधाकर मणेरे व सरोज मणेरे , चौसष्ठ ऋद्धी विधान-पन्नालाल नथमलजी बाकलीवाल व उषादेवी बाकलीवाल, श्रुतस्कंध विधान, पुष्पा रवींद्र बेडगे, लघुसिद्धचक्र विधान-सुरेखा अशोक कोंडे तर यज्ञनायक सुरेखा प्रकाश नाईक हे आहेत. शुक्रवारी (दि. ३०) सकाळी ध्वजारोहण अभिजीत कोले व खासदार राजू शेट्टी यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी महावीर गाठ, राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित असतील.शनिवार (दि. ३१) अमोलचंद झांझरी यांच्याहस्ते ध्वजारोहण, अरुण मणेरे यांच्या हस्ते मंडप, तर सुधाकर झेले यांच्याहस्ते कलश स्थापना व रमेश देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन. रविवार (दि. १) टिकमचंद पाटणी, बाबासाहेब पाटील हे मंडप उद्घाटन, बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते कलश स्थापना व राजेंद्र गांधी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन होईल. २ ते ४ फेब्रुवारीपर्यंत धीतरमल पाटणी, बी. टी. बेडगे, धनराज बाकलीवाल, बलराम महाजन, मुलचंद लुहाडिया, धीसुलाल बाकलीवाल, उत्तम आवाडे, भरतेश सांगरूळकर, श्रीपाल कटारिया, सुदीन खोत, सनतकुमार आरवाडे, यांना यजमानपदाचा मान मिळाला आहे. दररोज होणाऱ्या व्याख्यानामध्ये डॉ. धनंजय गुंडे - ‘गुरूदेव समंतभद्र विचार संगोष्टी’, प्रा. डॉ. यशवंत पाटणे - ‘गुरूदेवश्री समंतभद्र व वीर सेवा दल ऋणानुबंध’, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष डॉ. डी. ए. पाटील - ‘सुसंस्कृत मानव्याची गरज’, भुपेंद्रसिंह राठोड - ‘राष्ट्रीय चारित्र्य’, डॉ. अजित पाटील - ‘शाकाहार व व्यसनमुक्ती’, श्रीधर हेरवाडे - ‘गुरूदेव श्री समंदभद्र महाराजांची गुरूकुल परंपरा’ या विषयावर व्याख्यान होईल.