शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीपूर्व मिनी अंगणवाडी सेविकांच्या भरतीस मान्यता, प्रक्रिया सुरू करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

By समीर देशपांडे | Updated: April 29, 2023 12:41 IST

राज्यातील २०६०१ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती अंशत: उठवण्यात आली

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील २०६०१ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती अंशत: उठवण्यात आली आहे. मदतनीस म्हणून नव्या निकषानुसार दिलेल्या पदोन्नतीच्या आधी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या ज्या जागा रिक्त होत्या त्याची भरती प्रक्रिया सुरू करा, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.७ फेब्रुवारी २०२३ च्या पत्रानुसार नोव्हेंबर २०२२ च्या अहवालानुसार रिक्त असलेल्या ४,५०९ अंगणवाडी सेविका, ६२६ मिनी अंगणवाडी सेविका आणि १५ हजार ४६६ मदतनीस अशा २० हजार ६०१ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ३१ मे २०२३ पर्यंत भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यातील सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी जाहिराती देऊन अर्जही स्वीकारण्यास सुरुवात केली. याबाबतच्या शैक्षणिक आणि वयोमर्यादा पात्रतेबाबतचा सविस्तर शासन आदेशही याआधी काढण्यात आला.परंतु अंगणवाडी कर्मचारी संघटनेने सुधारित शैक्षणिक पात्रतेबाबत आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याची सुनावणी २४ मार्च रोजी झाली. त्यावेळी न्यायालयाने सकृतदर्शनी या आक्षेपांचा विचार करून १७ एप्रिल २३ पर्यंत या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. याप्रकरणी पुन्हा सुनावणी होऊन नव्या निकषानुसार बारावी उत्तीर्ण मदतनिसांना सेविका म्हणून पदोन्नती देण्याआधीची मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.पदोन्नतीच्या नव्या निकषाला आक्षेपपूर्वी दहावी उत्तीर्ण मदतनिसांना सेविका म्हणून पदोन्नती दिली जात होती. परंतु, शासनाच्या नव्या निकषानुसार बारावी उत्तीर्ण मदतनिसांना सेविका म्हणून पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या नव्या निकषालाच संघटनांनी न्यायालयात आव्हान दिले. म्हणूनच पदोन्नतीच्या आधीच्या रिक्त जागा भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHigh Courtउच्च न्यायालय