शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी लढायचं हाय, ५७ टक्के पोलिसांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 15:58 IST

CoronaVirus Police Kolhapur- कोरोना लढ्यात फ्रंट लाईन वॉरिअर्स म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या कोल्हापूर पोलीस दलातील ५७.३० टक्के पोलिसांनी पुढाकार घेत स्वत:चे लसीकरण करून घेतले. कोणतेही संकट झेलण्यासाठी नेहमीच पोलिसांचा पुढाकार असतो. शासनाच्या इतर विभागात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात टाळाटाळ होत असताना, पोलीस मात्र लसीकरणात अग्रेसर आहेत.

ठळक मुद्देकोरोनाशी लढायचं हाय, ५७ टक्के पोलिसांनी घेतली लस फ्रंट लाईन वॉरिअर्स : ९३ अधिकाऱ्यांनी, १६१० पोलिसांनी घेतला डोस

कोल्हापूर : कोरोना लढ्यात फ्रंट लाईन वॉरिअर्स म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या कोल्हापूर पोलीस दलातील ५७.३० टक्के पोलिसांनी पुढाकार घेत स्वत:चे लसीकरण करून घेतले. कोणतेही संकट झेलण्यासाठी नेहमीच पोलिसांचा पुढाकार असतो. शासनाच्या इतर विभागात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात टाळाटाळ होत असताना, पोलीस मात्र लसीकरणात अग्रेसर आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, तसा नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पोलिसाने स्वत:चा जीव धोक्यात घालून फ्रंट लाईन वॉरिअर म्हणून कर्तव्य बजावले. कोरोनाचा प्रादुर्भाव किती घातक आहे, याचा अनुभव पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचे कोरोनाने बळी गेले, तर अनेकांना कोरोनाने गाठले, तसे ते सहिसलामत बाहेरही पडले.

जिल्ह्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची एकूण २९७२ अशी संख्या आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आदेश देताच कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनीही टप्प्या-टप्प्याने स्वत:हून लसीकरण केंद्र गाठून लस घेतली.

लसीकरण तूर्त तरी ऐच्छिक असले तरीही, जिल्ह्यातील १०० टक्के पोलिसांनी लसीकरण करून घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली. आतापर्यंत १७१ पोलीस अधिकाऱ्यांपैकी ९३ अधिकाऱ्यांनी लस घेतली, तर २८०१ पोलिसांपैकी १६१० म्हणजेच ५८ टक्के पोलिसांनी लसीकरण करून घेतले. त्यामुळे लवकरच पोलिसांचे शंभर टक्के लसीकरण होणार, हे निश्चित.६४ टक्के महिला पोलिसांनी घेतली लसकोरोना संकटात रात्रं-दिवस महिला पोलिसांनीही एक पाऊल पुढे राहून काम केले आहे. त्यामुळे त्यांनाही कोरोना प्रतिबंधक लसीकरण तितकेच आवश्यक आहे. कुटुंब आणि नोकरी सांभाळण्याची कसरत करत त्यांनी कोरोनावर मात केली आहे. भविष्यातील कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण करून घेण्यात महिला पोलीसच अग्रभागी दिसत. कोल्हापूर पोलीस दलात आतापर्यंत सुमारे ६४ टक्के महिलांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेतली.दुसरा डोस घेतला १९ टक्के पोलिसांनीआतापर्यंत २३ पोलीस अधिकाऱ्यांनी, तर ५६५ पोलीस कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे लसीकरणाचा दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण हे १९.०१ इतके चांगले झाले आहे.

  •  जिल्ह्यातील एकूण पोलीस अधिकारी : १७१
  • लस घेतलेले अधिकारी : ९३
  • जिल्ह्यात एकूण पोलीस कर्मचारी संख्या : २८०१
  •  लस घेतलेले पोलीस कर्मचारी : १६१०
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर