ज्योतिप्रसाद सावंत --आजरा -आजऱ्यासह कोकणात पर्यटनासाठी येणारा पर्यटक घनसाळ तांदळाची मागणी आजरा तालुक्यातील तांदूळ उत्पादक व विक्रेत्यांकडे करू लागला असून, मागणी वाढत आहे; पण खात्रीशीर तांदूळ उपलब्ध नाही, अशी अवस्था सद्य:स्थितीत दिसत आहे.घनसाळ तांदळाला जी. आय. मानांकन मिळाले असून, त्याची जोरदार प्रसिद्धी महाराष्ट्रासह राज्याबाहेर झाली असल्याने दूरवरून रामतीर्थ, आंबोलीसह कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये ‘घनसाळ’ तांदळाबाबत कुतूहल आहे.याच कुतूहलापोटी ऐन पावसाळ्यात घनसाळ तांदळाची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यात प्रचंड मागणीमुळे सुटीमध्ये आलेल्या चाकरमान्यांनी बऱ्यापैकी तांदूळ उचलला आहे. पावसाळ्यातही घनसाळची मागणी कायम असल्याने मागणी आहे. परंतु, तांदूळ उपलब्ध नसल्याने खात्रीशीर तांदूळ मिळण्यात अडचणी येत आहेत.बाहेरगावचे पर्यटक हेरून काही मंडळी मात्र थेट घनसाळच्या नावावर इतर तांदूळ देत असल्याच्या तक्रारीही पुढे येऊ लागल्या आहेत.तालुका शेतकरी मंडळाने अशा व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला असूनही असे प्रकार घडत आहेत. तालुका शेतकरी मंडळाने फिरते पथक ठेवून अशा व्यापाऱ्यांसह किरकोळ तांदूळ विक्रेत्यांवर निर्बंध आणण्याची गरज आहे.
अहो... घनसाळ तांदूळ आहे का?
By admin | Updated: July 5, 2016 00:03 IST