शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

जगण्याच्या उमेदीने तिचे डोळे लुकलुकताहेत

By admin | Updated: March 11, 2017 23:15 IST

हुंबरवाडीच्या रेश्माची गंभीर कहाणी : मेरीटमधील विद्यार्थिनी तीन महिने कोमात

बाबासाहेब परीट --बिळाशी -घरी पिढ्यान्पिढ्याची गरिबी, आई बापाच्या पदरी तीन पोरी. पाय फुटल्यापासून त्यांचे धावणे सुरुच. कधी पोटासाठी... कधी शिक्षणासाठी... तर कधी स्वप्नांसाठी... प्रत्येक वर्गात पहिली! दहावीला मेरिटमध्ये, बारावीला केंद्रात पहिली! महाविद्यालयातही उत्तम गुण मिळवून अधिकारी होण्याची स्वप्नं पाहून त्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या लेकीच्या स्वप्नांना एकाएकी सुरुंग लागला. लाल दिव्याची स्वप्ने बघणारी रेश्मा ही कळी फुलण्याआधीच कोमेजली. गेले तीन महिने ती कोमात आहे. जगण्याच्या आणि जिंकण्याच्या उमेदीने तिचे डोळे लुकलुकताहेत आणि उद्याचे भविष्य पाहताहेत.बिळाशीपासून उत्तरेला दुरंडेवाडी (ता. शिराळा) त्या पलीकडे हुंबरवाडी पाच-पंचवीस घरांची वस्ती. येथे रस्ता नाही. पावसाळ्यात पाण्यातूनच ये-जा करावी लागते. पूर्ण आडवळणी डोंगराच्या पायथ्याला. तेथीलच २० वर्षांची रेश्मा संजय शिंदे पहाटे उजाडण्याआधीच अंधारात जाणारी, पहिली गाडी चुकू नये म्हणून दररोज चालत रहायची. दहावीला ७० टक्के गुण मिळवून तब्बल शेवटचे वर्ष पूर्ण करुन शिवाजी विद्यापीठाची अर्थशास्त्राची व यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची इंग्रजीची पदवी घेऊन बाहेर पडायचे, त्याचवेळी दहावीपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन अधिकारी व्हायचं स्वप्न तिने बघितले होते.ठरवून अभ्यास करणारी, शाळेपासूनच उत्तम भाषण करणारी, चांगली रांगोळी काढणारी लेक गेल्या सहा महिन्यात तीनवेळा आजारी पडली. एकदा टायफॉईड, पुन्हा डेंग्यू आणि त्यानंतर पुन्हा टायफॉईड झाला. औषधोपचार सुरु असतानाच एक दिवस ताप वाढला. त्याचा परिणाम मेंदूवर झाला. अन् चालती बोलती पोरगी कोमात गेली. मुंबईत सामान्य कामे करुन पोटाला चिमटा देऊन पोरीच्या शिक्षणाला पैसे पाठवणाऱ्या बापाने मुंबई सोडून गाव गाठले. आई आशा वर्कर म्हणून काम बघते. तीही या मुलीच्या जिवासाठी धडपडते. छोटे घर, पंधरा गुंठे जमीन आणि तिही लेकीसाठी विक्री करण्यात आली. सध्या आता त्यांच्याकडे विकायलाही काही नाही. या सगळ्या व्यापामध्ये त्यांच्या जगण्याकडे दुर्लक्ष तर झाले आहेच, पण पोरीच्या जिवाचा घोर कायम लागला आहे.लेकीसाठी नेकीनं मदत करूया..!मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज केलाय, पण अद्याप पैसे जमा नाहीत. तीन महिने अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. इस्लामपुरातून तिला मुंबईला हलवावे लागणार आहे. तिला जगून अधिकारी व्हायचं, पण त्यासाठी ती जगायला हवी ना? औषधोपचारासाठी तिला मोठ्या रकमेची गरज आहे. समाजातल्या दानशुरांनी सरळपणे मदत केली तर, एक कळी फुलणार आहे. एका लेकीसाठी सर्वांनी नेकीने मदत करुया. कोण्या एकाचे लाख नको, तर प्रत्येकाची लाखमोलाची मदत हवीय.