शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

‘हेल्पलाईन’ वीस मिनिटांत घटनास्थळी

By admin | Updated: May 31, 2014 00:39 IST

कुची अपघात : ‘कटर’मुळे अनेकांचे वाचले प्राण

सांगली : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे आज, शुक्रवारी पहाटे रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकवर एस.टी. बस आदळल्याने झालेल्या भीषण अपघाताचे वृत्त समजल्यानंतर सांगलीची ‘हेल्पलाईन’ टीम अवघ्या २० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. टीमकडे ‘रेस्क्यू आॅपरेशन कटर’ असल्याने बसचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढता आले, तसेच गंभीर जखमींचे प्राण वाचविता आले. आज पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती. ५.२५ वाजता ‘हेल्पलाईन’ टीमला या मार्गावरून प्रवास करणार्‍या लोकांनी या अपघाताची माहिती दिली. टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ, त्यांचे सहकारी सागर भानुसे, अविनाश पवार व अभिषेक लिमचे तातडीने रवाना झाले. अवघ्या २० मिनिटांत (पावणेसहा वाजता) ते घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत कवठेमहांकाळ पोलीस पोहोचले होते. बस प्रचंड वेगाने ट्रकवर डाव्या बाजूने आदळली होती. यामुळे ही बाजू फाटून गेली होती. या बाजूला बसलेल्या प्रवाशांपैकी चारजण ठार झाले, तर २० जण गंभीर जखमी झाले. जखमी व मृत बसच्या फाटलेल्या पत्र्यात अडकले होते. त्यांना बाहेर काढणे कठीण बनले होते. हेल्पलाईन टीम दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या ‘रेस्क्यू आॅपरेशन कटर’चा उपयोग झाला. या टीमने मृत व जखमींना कटरच्या मदतीने पत्रा कापून बाहेर काढले. एका जखमी महिलेचे तर दोन्ही हात व पाय तुटले होते. त्यांना लवकर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. टीमने अवघ्या १५ मिनिटांत बचावकार्य पूर्ण केले. मृत व जखमींना रुग्णालयात हलविल्यानंतर टीमने अपघातग्रस्त बस तेथून हलविली. आयुक्तांनी दिले कटर ‘हेल्पलाईन’ टीमचे उल्लेखनीय काम पाहून सांगली महापालिकेच्या आयुक्तांनी ‘रेस्क्यू आॅपरेशन कटर’ दिले आहे. पूर्वी हे कटर अग्निशामक दलाकडे होते. हे कटर असल्यामुळे मृत व जखमींना बसचा पत्रा कापून बाहेर काढता आले. पूर्वी हातोडा व छन्नीने ठोकून पत्रा कापला जात होता. मात्र, आयुक्तांनी कटर दिल्याने ही गैरसोय आता दूर झाली आहे. मिरजेतील कर्मचार्‍यांची संवेदनशीलता कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे झालेल्या एस.टी.बस व ट्रकच्या अपघातातील जखमींवर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एस.टी.च्या मिरज आगारातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संवेदनशीलतेने जखमी प्रवाशांना नातेवाईक येईपर्यंत आधार मिळाला. जखमींच्या नातेवाइकांना तातडीची आर्थिक मदतही देण्यात आली. (प्रतिनिधी)