शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नको असलेले मूल देण्यासाठी आता हेल्पलाईन

By admin | Updated: July 24, 2016 00:16 IST

अडचणीत सापडलेल्या मातांसाठी मदतीचा हात : बालसंकुल, केएमए, महिला दक्षता समितीचा पुढाकार

कोल्हापूर : परिस्थितीमुळे काही मातांवर आपल्या नवजात शिशूला सोडून देण्याची वेळ येते. त्यातून हे मूल काही वेळा रस्त्यावर, कधी कोंडाळ्यात, कधी उघड्यावर टाकले जाते त्यातून बाळाला इन्फेक्शन होतात, आजारपण येते, काहीवेळा असुरक्षित गर्भपात केला जातो, हे सगळे टाळण्यासाठी बालकल्याण संकुल, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, महिला दक्षता समितीच्यावतीने हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून अडचणीत सापडलेल्या मातांना मदतीचा हात देण्यात आला आहे. मे महिन्यात एका मातेने आपले नवजात अर्भक गंगावेशेत सोडले होते. प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या या बाळाला इन्फेक्शन झाल्याने या मुलीला सीपीआरमध्ये अ‍ॅडमिट करावे लागले होते. अशाच प्रकारच्या घटना वारंवार घडतात. यामुळे बाळाला इन्फेक्शन होऊन त्याचा जीव धोक्यात येतो. भ्रूणहत्या व शिशू हत्या टाळण्यासाठी व मूल टाकून देण्याच्या या घटनांना आळा बसावा यासाठी बालकल्याण संकुल, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, महिला दक्षता समितीने नको असलेले मूल आम्हाला द्या, अशी हाक दिली होती. त्याचे पुढचे पाऊल म्हणून या संस्थांच्या पुढाकारातून हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन अंतर्गत असलेल्या सर्व हॉस्पिटल, दवाखाने, लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये तसेच मेडिकलमध्येही हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहे. याशिवाय एसटी स्टॅन्ड, सार्वजनिक ठिकाणीही नंबरचे पत्रक चिकटवण्यात आले आहे. बालकल्याण संकुलातर्फे अनाथ बालकांचे संगोपन व पुनर्वसन केले जाते. तसेच अडलेल्या महिलेला विनाअट प्रवेश दिला जातो. संस्थेने आजवर २०० हून अधिक बालकांना दत्तक देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे ज्या पालकांना मूल नको असेल, त्यांनी ते रस्त्यावर किंवा उघड्यावर टाकण्याऐवजी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून या घटनेबद्दलची पूर्ण गुप्तता पाळली जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)नंबर असे ९८२३१९२९६३, ९९७५५०९०७६, ०२३१-२६२५४२९ या तिन्हीपैकी कोणत्याही एका हेल्पलाईन नंबरवर महिलेने संपर्क साधल्यास तातडीने मदत पाठवली जाईल. हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध केल्यापासून रोज किमान दोन तीन महिलांचे मदतीसाठी फोन येतात. त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते. बालकल्याण संकुलमध्ये गरोदर महिलांना प्रवेश दिला जातो, तेथून पुढे तिच्या बाळंतपणापर्यंतची जबाबदारी संस्था स्वीकारते. -पद्मजा तिवले, मानद कार्यवाह बालकल्याण संकुल