कोल्हापूर : कलापुरी व आधार सामाजिक संस्थेतर्फे ग्रामीण भागातील कारागिरांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. कांचनवाडी, सावर्डे, कळे, सांगरूळ, भोगाव, मल्हारपेठ, मांडवे, यळगुड, रणदिवेवाडी, कोल्हापूर अशा ४० गावांतील ५०० हून अधिक कारागिरांना महिनाभर पुरेल इतके रेशन देण्यात आले. यात तूर डाळ, मसूर डाळ, चटणी, हळद, साखर, ज्वारी, मसाल्याचे पदार्थ, साबण अशा साहित्यांचा समावेश आहे.
आधार संस्थेच्या अध्यक्ष अपर्णा चव्हाण, आतिश चव्हाण, अमरसिंह बागल, राजू भागोजी यांनी स्वत: पुढाकार घेत हे साहित्य विशेष वाहनांनी या कारागिरांच्या घरापर्यंत पोहोचविले. पहिल्या लॉकडाऊनमध्येदेखील कारागिरांना मदत करण्यात आली होती. आता दुसऱ्या लॉकडाऊनमध्येदेखील हीच मदतीची परंपरा पुढे सुरू ठेवत कलाकारांप्रती सामाजिक बांधिलकीची वीण अधिक घट्ट केली. या कलाकारांनी कोरोनाकाळातदेखील कोल्हापुरी चप्पल, दागिने, नऊवारी साडी, फेेटा, घोंगडी या अस्सल कोल्हापुरी वस्तूंची निर्मिती करून कलेचा वारसा जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला.
फोटो: १८०६२०२१-कोल-कलापुरी आधार
फोटो ओळ : कलापुरी व आधार सामाजिक संस्थेतर्फे ग्रामीण भागातील कारागिरांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.