जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार एंट्री केली. त्यामुळे तालुक्यातील घटप्रभा, जांबरे ही धरणे १०० टक्के भरली आहेत. जंगमहट्टी धरण ५० टक्के भरले आहे. मात्र, मध्यंतरी पावसाने विश्रांती घेतल्याने भात रोप लागवड खोळंबली होती. मात्र, पुन्हा पावसाने जोर धरल्याने भात रोप लागणीला जोर आला आहे.
म्हाताऱ्याचा जोर वाढला
दोन दिवसांपासून म्हातारा पाऊस सुरू झाला असून अपेक्षेप्रमाणे त्याचा जोर वाढला आहे. आणखीन दोन-तीन दिवस असेच सातत्य राहिल्यास तालुक्यातील सर्व धरणे व लघु-मध्यम प्रकल्प ओव्हरप्लो होण्याची शक्यता आहे.
चौकट :
झाड पडल्याने घरांचे नुकसान
बुधवारी (२१) सकाळी ९ च्या सुमारास कानूर बुद्रूक येथील कृष्णा गोंविद गावडे यांच्या घरावर झाड पडून ४० हजारांचे तर, याच गावातील धोंडिबा गावडे यांच्या घरावर झाड पडून एक लाखाचे नुकसान झाले आहे. मारुती आप्पा नाईक यांची भिंत पडून २० हजारांचे नुकसान झाले आहे.