शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात धुवांदार पाऊस, पंचगंगेचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 18:14 IST

Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दिवसभर धुवांदार पाऊस कोसळत आहे. गगनबावड्यासह राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी झाली असून धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून पंचगंगेचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे.

ठळक मुद्देगगनबावड्यासह राधानगरी, शाहूवाडीत अतिवृष्टी पंचगंगेचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दिवसभर धुवांदार पाऊस कोसळत आहे. गगनबावड्यासह राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी झाली असून धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून पंचगंगेचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. एक राज्य व दोन प्रमुख जिल्हा मार्ग बंद असून २२ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.जिल्ह्यात बुधवार पासून दोन दिवस धुवांदार पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार मंगळवारी रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला. सकाळी तर त्यात वाढ होत जाऊन अक्षरशा सुपाने पाणी ओतावे तशा पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे नाले तुडूंब होऊन रस्त्यांतून पाणी वाट शोधून जात होते.

गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात तर एक सारखा धुवांदार पाऊस राहिल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील बनले होते. कोल्हापूर शहरातही दिवसभर पाऊस राहिला असून पंचगंगेची पातळी यंदा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. सायंकाळी पाच पर्यंत २९ फुटांवर पातळी पोहचली होती. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर