शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची भुरभुर, गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 11:43 IST

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची भुरभुर राहिली. काही तालुक्यांत अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने बळिराजाने नि:श्वास सोडला आहे. गगनबावडा तालुक्यात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाची भुरभुरगगनबावडा तालुक्यात ५८.५० मिमी पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची भुरभुर राहिली. काही तालुक्यांत अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने बळिराजाने नि:श्वास सोडला आहे. गगनबावडा तालुक्यात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ५८.५०मिमी पाऊस पडल्याची नोंद झालीआठ-दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली आहे. पावसाला जोर नसला तरी अधूनमधून गगनबावडा, भुदरगड, चंदगड, आजरा, तालुक्यांत मात्र जोरदार पाऊस झाला. 

जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ५८.५०मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत ४७.५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आज,शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

सकाळपासूनच पावसाची भुरभुर सुरू झाली आहे. पावसाने दुपारी काहीशी विश्रांती घेतली असली तरी त्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. या पावसाने बळिराजाला दिलासा मिळाला असून खरीप पिकांना पोषक ठरत आहे. खरीप पिकांची खुरपणीची कामे संपली आहेत. अजूनही जिल्ह्याच्या पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात भाताच्या रोपलागण्या प्रलंबित आहेत.

या लागण्यांसह नागलीसाठी पाऊस गरजेचा आहे. त्यामुळे गेले आठ दिवस शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत.

शनिवारी सकाळी आठपर्यंत तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -हातकणंगले- ०.३८ एकूण १३२ मिमी, शिरोळ- ०.१४ एकूण १२७.२९ मिमी, पन्हाळा- ३.८६ एकूण ३७५.४३ मिमी, शाहूवाडी- १७.८३ मिमी एकूण ५४८, राधानगरी- ११.८३ एकूण ५००.८३ मिमी, गगनबावडा- ५८.५० मिमी एकूण १३२६ मिमी, करवीर- १.५५ एकूण ३२४.६४ मिमी, कागल-१३.२९ एकूण ३७३.४३ मिमी, गडहिंग्लज- ८.७१ एकूण २४९.१४ मिमी, भुदरगड- १८ एकूण ४४२.४०मिमी, आजरा- १८.२५ एकूण ५०१.२५ मिमी, चंदगड- १४.१७ मिमी एकूण ५३६ मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर