शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पावसाचा लोकांना ताप परंतू जिल्ह्यात पिकांना लाभदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 15:23 IST

रोज सायंकाळ करून येणाºया पावसाचा लोकांना त्रास होत असला तरी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच पिकांना हा पाऊस मात्र लाभदायक असल्याचे जाणकार शेतकºयांचे म्हणणे आहे. भातपिक सध्या बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे दाणे भरेपर्यंत पिकाला पाण्याची गरज लागते. मध्यंतरी जुलैमध्ये पावसाने ओढ दिली होती, त्यावेळी आकसलेले ऊसपिकही या पावसाने जोमाने वाढणार आहे.

ठळक मुद्देपिकांना हा पाऊस लाभदायक आकसलेले ऊसपिकही या पावसाने जोमाने वाढणारभातासह भुईमूगालाही हा पाऊस पोषकच यंदा दसरा-दिवाळीतही असाच पाऊस सुरु राहण्याची भिती

कोल्हापूर : रोज सायंकाळ करून येणाºया पावसाचा लोकांना त्रास होत असला तरी सर्वच पिकांना हा पाऊस मात्र लाभदायक असल्याचे जाणकार शेतकºयांचे म्हणणे आहे. भातपिक सध्या बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे दाणे भरेपर्यंत पिकाला पाण्याची गरज लागते. मध्यंतरी जुलैमध्ये पावसाने ओढ दिली होती, त्यावेळी आकसलेले ऊसपिकही या पावसाने जोमाने वाढणार आहे.

अलिकडील कांही वर्षात जून-जुलैमध्ये हक्काच्या महिन्यांत पाऊस ओढ देतो व तो पुढील कांही महिन्यांत सरकतो असा अनुभव येत आहे. यंदाही त्याचेच प्रत्यंतर येत आहे. सलग आठवडाभर दिवसभर चक्क लखलखीत ऊन पडत आहे. आॅक्टोबर हिटचा तडाखा बसावा असा उष्म्याचा त्रास होत आहे आणि दुपारनंतर मात्र पाऊस झोडपून काढत आहे.

बुधवारी रात्री तर पावसाने कहरच केला.रात्री अकरानंतर सुमारे दोन तास पाऊस बादलीने पाणी ओतावे तसा कोसळत होता. त्यामुळेच रस्त्यांना नदीचे स्वरुप आले. जिल्ह्याच्या कांही भागात आडसाली लागणीचे जोमदार आलेले ऊस पिक भुईसपाट झाले आहे.

सध्या पिकांचा दाणे भरण्याचा काळ आहे.या काळात पावसाची गरज असते. जे भात आता पोटरीला आले आहे, ते पूर्ण पक्व व्हायला किमान महिन्यांचा अवधी असतो. त्यामुळे भातासह भुईमूगालाही हा पाऊस सध्या हानीकारक नाही. ऊसाची वाढ चांगली व्हायलाही तो पोषकच आहे. घटस्थापणा २१ सप्टेंबरला आहे व २६ पासून हस्त नक्षत्र सुरु होते.

नवरात्रीच्या वातीत पाऊस अडकला तर तो हमखास पडतो असा परंपरागत आडाखा आहे. त्यामुळे यंदा दसरा-दिवाळीतही असाच पाऊस सुरु राहण्याची भिती व्यक्त होत आहे. पिक काढणीच्या हंगामात तो सुरु राहिला तर मात्र शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. व हातात आलेले पिकाचेही नुकसान होणार आहे.कोल्हापूर जिल्ह्याची पिक स्थिती पाहता सध्याचा पाऊस पिकांना पोषक आहे. कांही ठिकाणी ऊस वाºयाने पडला असला तरी हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.प्र.रा.चिपळूणकरप्रयोगशील शेतकरी