शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण सोडतीवर उद्या सुनावणी

By admin | Updated: August 6, 2015 01:13 IST

न्यायालयात घेतलेली धाव व्यर्थ : आयोगाचे वकील अनुपस्थित

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने सोडत काढण्याच्या निर्णयास आव्हान देत पूर्वी निश्चित केलेली आरक्षणेच कायम ठेवावीत, या मागणीसाठी शिवसेनेने उच्च न्यायालयात घेतलेली धाव बुधवारी व्यर्थ ठरली. न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल झाली; पण त्यांनी कोणतीही सुनावणी न घेता ही याचिका न्या. अनुप मोता व न्या. अचेलिया यांच्या खंडपीठाकडे वर्ग केली. त्यामुळे याचिकेवर बुधवारी कोणतेही कामकाज झाले नाही. पुढील सुनावणी उद्या, शुक्रवारी होणार आहे. गेल्या शुक्रवारी (दि. ३१) काढण्यात आलेली आरक्षण सोडत बदलली गेल्यास शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे; तसेच अनेक उमेदवारांवर अन्याय होणार आहे. म्हणूनच यापूर्वी निश्चित केलेली आरक्षणे कायम ठेवावीत, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. ही याचिका शिवसेनेचे कार्यकर्ते राहुल बंदोडे व अविनाश कामते यांनी दाखल केली असून, त्यात महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायालयात महापालिकेचे वकील अभिजित आडगुळे, याचिकाकर्ते बंदोडे यांचे वकील बाळकृष्ण जोशी उपस्थित होते. मात्र निवडणूक आयोगाचे वकील उपस्थित नव्हते. (प्रतिनिधी)