शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

सासर्‍याकडुन सुनेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:20 IST

कोल्हापूर / कळे : मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथे सासूला अंघोळीला आधी पाणी न दिल्याच्या किरकोळ वादातून सासºयाने कोयत्याने सुनेचे दोन हात तोडून खून केला; तर दोन लहान नातवंडांवर हल्ला केला. शुभांगी रमेश सातपुते (वय ३०) असे मृताचे नाव आहे, तर मयूरेश रमेश सातपुते (९), तनिष्का रमेश सातपुते (४) हे गंभीर ...

कोल्हापूर / कळे : मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथे सासूला अंघोळीला आधी पाणी न दिल्याच्या किरकोळ वादातून सासºयाने कोयत्याने सुनेचे दोन हात तोडून खून केला; तर दोन लहान नातवंडांवर हल्ला केला. शुभांगी रमेश सातपुते (वय ३०) असे मृताचे नाव आहे, तर मयूरेश रमेश सातपुते (९), तनिष्का रमेश सातपुते (४) हे गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी आठला घडलेल्या या घटनेने जिल्हा हादरून गेला. याप्रकरणी सासरा पांडुरंग दशरथ सातपुते (वय ६५), सासू शांताबाई पांडुरंग सातपुते (६०) यांच्यावर कळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.अधिक माहिती अशी, शुभांगी सातपुते ही बुधवारी सकाळी अंघोळीला पाणी गरम करून बाथरूममध्ये गेली. आपणाला अगोदर अंघोळीसाठी पाणी न दिल्याच्या रागातून सासू शांताबाईने मोठ-मोठ्याने शिवीगाळ केल्यानंतर शुभांगीने प्रतिउत्तर दिले. सासूला उलट बोलते याचा राग मनात धरून सासºयाने घरातील कोयत्याने शुभांगीवर हल्ला केला. तिचे दोन्ही हात तोडून टाकत डोक्यावर, छातीवर, पोटावर, पायावर २६ वर्मी घाव घातले. हल्ल्यावेळी शुभांगीची किंचाळी ऐकून शेजारील लोक हादरले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहण्यासाठी पुढे सरसावलेल्या मयूरेश व तनिष्का या लहान मुलांवरहीक्रूरपणे वार केले. शुभांगीचा पती रमेश हा पहाटे शेतात गेला होता. त्याला या घटनेची माहिती समजताच तो घरी आला. पत्नी व दोन मुले रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून रमेशने चप्पला बनविण्यासाठी वापरली जाणाºया रापीने वडिलांच्या पायावर वार केला. अघटित घडलेल्या या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेला. नागरिकांनी कळे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी चौघांनाही तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. शुभांगीची प्रकृती अत्यावस्थ असल्याने तिला राजारामपुरी येथील खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच पती रमेशने रुग्णालयाबाहेर केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. मयूरेश व तनिष्का यांच्यावर सीपीआरमध्ये तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. घटनास्थळी शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक देसाई करीत आहेत.आण्णा, आईला मारू नकापांडुरंग हा शुभांगीवर हल्ला करीत असताना तिची दोन्ही मुले ‘आण्णा, आईला मारू नका’ अशा विनवण्या करू लागले; परंतु त्याने या दोन्ही मुलांनाही लक्ष्य केले. तनिष्का त्याच्या हातातून सुटून बाहेर रस्त्यावर पळत आली. यावेळी त्याने पाठीमागून येऊन काठीने हल्ला केला. दवाखान्यात भेदरलेल्या अवस्थेत दोघेही ‘मम्मी कुठं आहे?’ अशी विचारणा करीत होते.नवीन घरात रक्ताचा सडासातपुते कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी दुमजली आरसीसी घर बांधले आहे. या घराची वास्तुशांती करून ते राहण्यास नुकतेच गेले होते. त्याच घरातील फरशीवर शुभांगी व तिच्या मुलांचा रक्ताचा सडा पडला होता. घटनास्थळावरील दृश्य मन हेलावून टाकणारे होते.सासºयाचा स्वभाव तापटक्रूर सासरा पांडुरंग सातपुते हा गेल्या २५ वर्षांपासून चप्पल खरेदी व विक्रीचा व्यवसाय करतो; पूर्वी तो मुंबईत होता. आठ वर्षांपासून मल्हारपेठ येथे आला आहे. त्याचा स्वभाव पूर्वीपासून तापट, चिडचिडा आहे. त्यामुळे कुटुंबीयांशी त्याचा वारंवार वाद होत असे. सून शुभांगीशी किरकोळ कारणावरून सासू-सासरे वाद घालत. बुधवारची घटना इतकी भयंकर घडेल याची कल्पनाही शेजाºयांनी केली नव्हती. भरल्या संसाराची सासू-सासºयानेच राखरांगोळी केली. या सासू-सासºयाच्या विरोधात गावात संताप व्यक्त होत होता.