Raju Shetti : मागील काही दिवसांपासून शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरात विरोध सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला आहे. कोल्हापूरातील माजी खासदार राजू शेट्टी यांनीही शक्तिपीठला विरोध केलाय. दरम्यान, आता यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसापूर्वी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांची ५०० एकर जमीन असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला होता. या गौप्यस्फोटवर आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर देत आमदार क्षीरसागर यांना ओपन चॅलेंज दिले आहे.
शेट्टी यांनी क्षीरसागर यांना ही ५०० एकर जमीन माझ्या नावावर कुठे आहे हे सिद्ध करावे अन्यथा त्यांनी स्वतःची संपत्ती अंबाबाई देवीला दान करावे असे आव्हान दिले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
"मी गेल्या २५ वर्षात सार्वजनिक क्षेत्रात पाच निवडणुका लढविल्या. त्या निवडणुकीत मी माझ्या चल व अचल संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. त्या विवरणपत्रा व्यतिरिक्त राजेश क्षीरसागर यांनी आरोप केलेल्या ५०० एकर जमीनीचे सात बारे त्यांनी दाखवावे, असंही राजू शेट्टी म्हणाले.
...तर त्यांच्या नावावर असणारी संपत्ती अंबाबाई मंदिराच्या नावावर करावी
शेट्टी यांनी २६ जुलै रोजी १२ वाजता स्वत: कोल्हापूरातील बिंदू चौकात येणार असल्याची माहिती दिली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी लोकसभेतील विवरण पत्राव्यतिरिक्त 500 एकर जमीनीचे सात बारे त्यांनी दाखवावे ती सर्व जमीन राजेश क्षीरसागर यांचे नावे बक्षिसपत्र करणार आहेत. जर राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी दुपारी १२ वाजता बिंदू चौकात न आल्यास त्यांनी त्यांच्या नावे असणारी सर्व संपत्ती करवीर निवासनी आई अंबाबाई मंदिराच्या नावे करावी", असं आव्हान शेट्टी यांनी आमदार क्षीरसागर यांना दिले.