शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वळीवडेत बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ७२ हजार रुपयांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:26 IST

वळीवडे (ता. करवीर) येथील कोयना कॉलनी परिसरात पुराचे पाणी आल्याने बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाट उचकटून ...

वळीवडे (ता. करवीर) येथील कोयना कॉलनी परिसरात पुराचे पाणी आल्याने बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाट उचकटून सुमारे ७२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. पुराचे पाणी कमी झाल्यानंतर मंगळवारी ही चोरी उघडकीस आली. याबाबत राकेश चंदरलाल सचदेव (वय ३३, रा. वळीवडे, ता.करवीर) यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

राकेश सचदेव यांचे गांधीनगर मुख्य रस्त्यावर आराध्या ट्रेडिंग नावाचे कारपेट दुकान आहे. सचदेव हे आपले वडील, भाऊ, भावजय यांच्यासह वळीवडे हद्दीत कोयना कॉलनी परिसरात राहतात. पुराचे पाणी वाढल्यामुळे ते दि. २३ जुलैला फ्लॅटला कुलूप लावून नातेवाईक यांच्या घरी राहण्यास गेले होते. मंगळवारी दि. २७ रोजी पुराचे पाणी कमी झाल्याने सचदेव कुटुंब परत घरी गेले असता ही चोरीची घटना उघडकीस आली. घटनास्थळी गांधीनगरचे सपोनि राजेश खांडवे व पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम यांनी भेट दिली.