शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

घरफाळा घोटाळ्यात ‘एचसीएल’ही भागीदार

By admin | Updated: September 15, 2015 00:56 IST

महापालिका सभेत आरोप : पैसे वसुलीची ‘सुपारी’ घेतल्यावरुन गदारोळ; कंपनीचेही सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आयुक्तांचे आश्वासन

कोल्हापूर : घरफाळा विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर महानगरपालिका सभेत प्रचंड गदारोळ उडाला. चुकीची बिले आकारून पैसे वसुलीची ‘सुपारी’ घेतली आहे काय, असा संतप्त सवाल करत सदस्यांनी प्रशासनावर कडाडून टीका केली. आयुक्त पी. शिवशंकर आणि एचसीएल कंपनी या टीकेचे प्रमुख लक्ष्य ठरले. सदस्यांच्या आक्रमक भूमिकेने गोंधळून गेलेल्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. शेवटी घरफाळा बिले काढणाऱ्या एचसीएल कंपनीचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश आयुक्तांना द्यावे लागले. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी महापौर मीना सूर्यवंशी होत्या. घरफाळा विभागात झालेल्या घोटाळ्यास केवळ मनपाचे कर्मचारीच नाहीत, तर एचसीएल कंपनीही जबाबदार असल्याने या प्रकरणाची वेगवेगळ्या स्तरावर चौकशी करून घोटाळ्याची जबाबदारी निश्चित करावी, असा ठराव निशिकांत मेथे यांनी सभागृहात मांडला होता. त्यावरून या विषयाला वाचा फुटली आणि टीकेचे धनी एचसीएल कंपनी तसेच आयुक्त ठरले. जर मनपाचे ६९ कर्मचारी आणि ७ अधिकारी घरफाळा विभागातील घोटाळ्याला जबाबदार असतील तर घरफाळ्यातून थकबाकीची रक्कम सूट देऊन बिले काढणाऱ्या एचसीएल कंपनीला का जबाबदार धरत नाही, असा सवाल महेश कदम, निशिकांत मेथे, राजेश लाटकर यांनी प्रशासनाला विचारला. मुरलीधर जाधव, यशोदा मोहिते, सुभाष रामुगडे यांनी तर चक्क चुकीची बिले कशी आली आहेत, हे पुराव्यांनिशी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. एकाचवर्षी बांधलेल्या एकसारख्या इमारतींना वेगवेगळ्या फरकाची बिले कशी काय दिली जातात, असा प्रश्न करत प्रशासनाची हुकूमशाही, दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा शारंगधर देशमुख यांनी दिला. निवडणुकीच्या तोंडावर चुकीची बिले देऊन नगरसेवकांना बदनाम करण्याचे कटकारस्थान केले जात असल्याचा थेट आरोपही देशमुख यांनी प्रशासनावर केला. प्रा. जयंत पाटील, सुभाष रामुगडे, सचिन खेडकर, सुनील पाटील, महेश सावंत, निशिकांत मेथे, आर. डी. पाटील यांनी महापौरांच्या आसनाकडे धाव घेऊन एचसीएल कंपनीच्या कारभारावर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. चुकीची बिले वाटणाऱ्या ‘एचसीएल’मार्फत पैसे वसुलीची सुपारी घेतली आहे का, असा सवालही रामुगडे यांनी केला. आयुक्त शिवशंकर यांनी घरफाळा घोटाळ्यात कंपनीचा काही संबंध नाही, असा खुलासा करताच गोंधळात आणखी भर पडली. त्यामुळे चुका झाल्या असतील तर त्या दुरूस्त केल्या जातील, असे घरफाळा अधिकारी दिवाकर कारंडे यांनी सांगितले. मात्र, त्यावरही सदस्यांचे समाधान झाले नाही. इस्टेट अधिकारी संजय भोसले काही खुलासा करायला पुढे येताच त्यांनाही सदस्यांनी धारेवर धरले. त्यांना खाली बसविले. शेवटी आयुक्तांनी एचसीएलच्या कामकाजाचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या विषयावर पडदा पडला. सदस्यांच्या आक्रमकपणामुळे अधिकाऱ्यांची मात्र बोबडी वळली. दर सोमवारी पाणीपुरवठा बंदचा ठराव राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि कोल्हापुरात पावसाने ओढ दिल्याने भविष्यकाळात पाणीटंचाई भासू नये म्हणून प्रत्येक सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवावा, असा ठराव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला, परंतु हा सदस्य ठराव असल्याने प्रशासन त्याची अंमलबजावणी करणार काय, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. महासभेत निशिकांत मेथे यांनी हा सदस्य ठराव मांडला होता, परंतु त्यावर कोणतीही चर्चा न होता तो मंजूर करण्यात आला. शहरात मनपाच्या मालकीची पाच ते सहा हजार बोअरवेल आहेत; त्यातील ७० टक्के बोअर बंद आहेत. बजेट उपलब्ध करून ती बोअर दुरूस्त करून घ्यावी. दर सोमवारी पाणीपुरवठा बंद करावा, ज्यामुळे पाणीसाठाही शिल्लक राहील, असे ठरावात म्हटले आहे. शहरात पाणी कपातीसारखी परिस्थिती नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.राधानगरी धरण पूर्ण भरले आहे, तरीही निशिकांत मेथे यांनी दिलेल्या ठरावाची अंमलबजावणी केली जाणार का, हा प्रश्न आहे.