माजी अध्यक्ष मनोहरपंत तेलसिंगे व उपाध्यक्ष रायगोंडा पाटील यांच्या निधनानंतर समाजात पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी तसेच समाजाच्या उन्नतीसाठी सर्व ज्येष्ठ विश्वस्तांच्या संमतीने नवी कार्यकारिणी निश्चित केली. यावेळी मागील सर्व विषयांचा आढावा घेतला. नवनियुक्त अध्यक्ष मेत्री यांनी येत्या काळात समाजबांधवांच्या सहकार्याने समाजाचे कामकाज प्रगतिपथावर नेण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले. कार्यकारिणीमध्ये प्रशांत गलगले (सेक्रेटरी), चिंतामणी पारिशवाड (खजिनदार), महादेव खानाज, वसंतराव महिंद, संजय म्हेतर, श्रीकांत कबाडे, शशिकांत कोलार, शाहूगोंडा पाटील, शिवकांत परमाज, सुनील गदाळे, पद्माकर तेलसिंगे यांची सदस्यपदी निवड केली, तर सुरेश पाडळे, गणेश कोल्हापुरे, चंद्रकांत हासबे, बाळासाहेब मनवाडी, इराण्णा सिंहासने, बाबूराव कोष्टी यांची सुकाणू समितीमध्ये निवड केली.
हटकर कोष्टी समाजाची कार्यकारिणी व सुकाणू समिती जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST