आवळे म्हणाले, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या मोदींनी जनतेच्या लोक कल्याणाचे कोणतेही भरीव काम केले नाही. शेतीपासून उद्योग धंद्यापर्यंत केंद्र शासनाने सर्वांचे नुकसान केले आहे. मोदींना भांडवलदारांच्या ताब्यात देश द्यायचा असून, देशातील रेशनिंग व्यवस्था बंद पाडून मॉल व्यवस्था अस्तित्वात आणायची आहे. यामुळे सरकारी कंपन्या विकायचा सपाटा त्यांनी लावला आहे. आर.एस.एस.च्या धोरणानुसार आदानी आणि अंबांनीच देश चालवीत आहेत, तरी युवकांनी जागृत राहावे.
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, युवा जोडो अभियानाअंतर्गत गाव तेथे शाखा काढून युवकांना काँग्रेस पक्षात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. युवकांनी काँग्रेस पक्ष मजबुतीसाठी वेळ देण्याची गरज आहे. या कार्यक्रमास युवक काँग्रेसच्या सरचिटणीस गायत्री सेन, कोल्हापूर जिल्हा पक्ष निरीक्षक नितीन बागे, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान जाधव, हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर, शकील अत्तार, तालुका अध्यक्ष सचिन बोराडे, भैरू पवार, बाजीराव सातपुते, अरुण पाटील, अमर पाटील, ‘नुरमहमद मुजावर राजू कचरे, अरबाज मुजावर, शंकर शिंदे, एस. एम. पाटील, अनिल धोंगडे, महिपती दबडे, उत्तम पाटील, बाळासो नाईक, आदी उपस्थित होते. डॉ. विजय गोरड यांनी आभार मानले.
फोटो= हातकणंगले येथील युवक काँग्रेसच्या पद वाटप कार्यक्रमात बोलताना आ. राजू आवळे, शिवराज मोरे, सचिन बोराडे, नितीन बागे, गायत्री सेन, भगवान जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.