हातकणंगले (प्रतिनिधी )
हातकणंगले तालुक्यामध्ये आरोग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या काळामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे आपली जबाबदारी बजावली आहे, त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे असे गौरवद्गार आमदार राजू बाबा आवळे यांनी काढले. आरोग्य विभागाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये ते बोलते होते.
हातकणंगले तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ४६ उपकेंद्र अंतर्गत माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम अंतर्गत सर्व गावांचे मूल्यमापन करण्यात आले होते. यामध्ये चोकाक प्रथम क्रमांक, मिणचे द्वितीय क्रमांक, निलेवाडी तृतीय क्रमांक तसेच शालेय विद्यार्थी, शिक्षकांमध्ये निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये विजेत्या स्पर्धकांना तालुका पंचायत समिती आरोग्य अधिकारी सुहास कोरे, प्रातांधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार प्रदीप उबाळे , गटविकास अधिकारी शबाना मोकाशी , पंचायत समिती सभापती प्रदीप पाटील , उपसभापती राजू भोसले , यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण करण्यात आले.
२६ हातकणंगले
फोटो = आरोग्य विभागाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेचे बक्षीस वितरण करताना आ. राजू बाबा आवळे व इतर मान्यवर