शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

हातकणंगले लोकसभा मतदार संघ, २०१९ : कोण जिंकेल हातकणंगले; राजू शेट्टींची हॅट्रीक की धैर्यशील मानेंची विजयी सुरुवात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 10:40 IST

हातकणंगले लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे धैर्य शील माने हे दुसऱ्या फेरीअखेर 12231मतांनी आघाडीवर.  पहिल्या मतमोजमीमध्ये आघाडी. धैर्यशील माने यांना शिवसेनेच्या  धैर्यधील माने यांना 8442 मतांची  आघाडी आहे . 

ठळक मुद्दे धैर्यधील माने यांना 8442 मतांची आघाडीराजू शेट्टी 5500 मतांनी पिछाडीवरखासदार राजू शेट्टी पिछाडीवर

हातकणंगले : कोल्हापूर मतदारसंघाप्रमाणेचे जवळच असलेलाला हातकणंगले हा देखिल मतदार संघ राज्यभर गाजत आहे. शेतकऱ्यांचे नेते म्हणून परिचित असलेल्या महायुती पुरस्कृत स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची असून यंदा ते हॅट्रीक साधणार का याकडे लक्ष आहे. मोदी लाट असतानाही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी सलग दुसरा विजय मिळविला होता. राजू शेट्टी यांना ६ लाख ४० हजार ४२८ इतकी मत मिळाली होती. ते १ लाख ७७ हजार ८१० मताधिक्यांनी विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाआण्णा आवाडे यांचा पराभव केला होता. आवाडे यांना ४ लाख ६२ हजार ६१८ इतकी मत मिळाली होती.

या मतदार संघात राजकीय क्षेत्रातील अनुभव, भाजपविराधी घेतलेली आक्रमक भूमिका व शेतकऱ्यांचे नेते म्हणून राजू शेट्टी यांची विशेष ओळख आहे, दुसºया बाजूला शिवसेनेकडून तरूण नवीन चेहरा व तसेच राजकीय घराणेशाहीचे पाठबळ यामुळे धैर्यशील माने यांनीही हातकणगंले मतदार संघावर हक्क दाखविला आहे. त्यामुळे नवीन चेहरा की अनुभवी राजू शेट्टी यासाठी हातकणंगले मतदार संघाचा कौलही महत्वाचा असून यात सरस कोण ठरणार आहे हे काही तासातच समजणार आहे.

यंदाच्या निवडणुकीतही महाआघाडीचे राजू शेट्टी यांची विचारधारा, कार्यप्रणाली व महाआघाडीच्या नेत्यांचे मिळणारे पाठबळ व सदाभाऊ खोत यांच्यातील दुफळी यामुळे शेट्टी यांची ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली आहे. दुसºया बाजूला शिवसेनेकडून मिळालेला नवा चेहरा व तरुण नेतृत्व तसेच भाजप व शिवसेना युतीमुळे धैर्यशील माने यांनाही मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे अवघ्या काही तासातच हातगणंगलेला धैर्यशील माने हा तरुण नेता मिळणार की अनुभवी नेते राजू शेट्टी यांची वर्णी लागणार हे समजणार आहे. पुढील राजकीय घडामोडींसाठी यातील विजेता नेता महत्वाचा ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता सकाळी सुरुवात झाली यात हातकणंगले मतदार संघातील, राजू शेट्टी पिछाडीवर असून दुसऱ्या फेरी अखेर 3500 मताची  आघाडी मिळाली आहे. पहिल्या मतमोजमीमध्ये आघाडी. धैर्यशील माने यांना शिवसेनेच्या  धैर्यधील माने यांना 8442 मतांची  आघाडी आहेगेल्या निवडणुकीत स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना ६ लाख ४० हजार ४२८ इतकी मत मिळाली होती. काँग्रेसचे कल्लाप्पाआण्णा आवाडे यांना ४ लाख ६२ हजार ६१८ इतकी मत मिळाली होती. या निवडणुकीत एकूण १७ लाख ६५ हजार ७४४ इतके मतदान झाले आहे.

 

 

 

टॅग्स :hatkanangle-pcहातकणंगलेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल