शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

हासूर सासगिरी पहिले वीज थकबाकीमुक्त गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:21 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हासूर सासगिरी (ता. गडहिंग्लज) हे पहिले वीजबिल थकबाकीमुक्त गाव ठरले. गावातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हासूर सासगिरी (ता. गडहिंग्लज) हे पहिले वीजबिल थकबाकीमुक्त गाव ठरले. गावातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वर्गवारीतील वीज ग्राहकांनी टाळेबंदी कालावधीतील थकीत वीजबिलासह चालू वीजबिलांचा भरणा केला आहे. महावितरणने येथील ग्रामस्थांचे आभार मानले आहेत. जनमित्र यशवंत सावंत यांचा पाठपुरावा, ग्राहक सेवेमुळे हे शक्य झाले आहे.

सामानगड किल्ल्याच्या पायथ्याशी, डोंगरांच्या कुशीत हे गाव वसलेले आहे. गावची लोकसंख्या जवळपास १,१०० आहे. गावातील २४५ वीज ग्राहकांना सेवा पुरवली जाते. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा या वर्गवारीतील १५३ वीज ग्राहकांनी २ लाख ३ हजार ५४८ रुपये थकबाकीचा भरणा केला. सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्या सहकार्यातून गाव थकबाकीमुक्त झाले. येथील प्रतिष्ठ‍ित ग्रामस्थ विष्णू कदम यांनी वायरमन सावंत यांनी चांगली सेवा दिल्यामुळेच थकबाकी शून्य झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी गावातील शेतीपंपाचीही थकबाकी शून्य करण्याचे आश्वासन दिले आहे. गावातील ९४ शेतीपंप ग्राहकांकडे वीजबिलाची १२ लाख ५५ हजारांची थकबाकी आहे.

कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या हस्ते जनमित्र सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय अभियंता संदीप दंडवते, शाखा अभियंता संजय पाटील यांच्यासह जनमित्र उपस्थित होते.