शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

हसरं कोल्हापूर...!-- दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:18 IST

-चंद्रकांत कित्तुरेरविवारी जगभरात जागतिक हास्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोल्हापुरातही तो राजर्षी छत्रपती शाहू हास्ययोग परिवाराच्या नेतृत्वाखाली २५ हास्यक्लबनी एकत्रितपणे साजरा केला. यानिमित्त स्वच्छ, सुंदर आणि हसऱ्या निरोगी कोल्हापूरची स्वप्नं साकार करण्यासाठी हास्ययोगाचा प्रचार आणि प्रसार गल्लोगल्ली करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत हसायला वेळ आहे ...

-चंद्रकांत कित्तुरेरविवारी जगभरात जागतिक हास्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोल्हापुरातही तो राजर्षी छत्रपती शाहू हास्ययोग परिवाराच्या नेतृत्वाखाली २५ हास्यक्लबनी एकत्रितपणे साजरा केला. यानिमित्त स्वच्छ, सुंदर आणि हसऱ्या निरोगी कोल्हापूरची स्वप्नं साकार करण्यासाठी हास्ययोगाचा प्रचार आणि प्रसार गल्लोगल्ली करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत हसायला वेळ आहे कुणाला? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. कारण दैनंदिन जीवनात आपण इतके गुंतून गेलेलो असतो की व्यायामासाठी, आरोग्यासाठी आपल्याला वेळच नसतो, असे सांगणारे अनेकजण भेटतात. यातूनही खास आरोग्याकडे लक्ष देणारे, नियमित फिरायला जाणे, व्यायाम करणे, योगा करणे किंवा जीममध्ये जाणे असे करणारेही अनेकजण आहेत. पण तुलनेने त्यांचे प्रमाण कमी दिसते. आरोग्यासाठी हास्य किती गरजेचे आहे, हे हसणाºया व्यक्तीलाच कळू शकते. सदैव स्वत:च्या विचारात दुर्मुखलेल्या चेहºयाने दैनंदिन जीवन रेटणाºयांना ते कसे कळणार? ठिकठिकाणचे हास्य क्लब हे त्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि न हसणाºयांनाही हसायला लावत आहेत. कोल्हापुरात २० मे १९९८ साली त्र्यंबोली हास्य क्लबची स्थापना डॉ. दिलीप शहा आणि त्यांच्या सहकाºयांनी केली. योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे मार्गदर्शन त्यांना त्यासाठी लाभले. कोल्हापुरातील हा पहिला हास्यक्लब. त्यानंतर हास्य योगाचे महत्त्व लक्षात येईल तसे हळूहळू शहरातील प्रत्येक बागेमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन हास्य क्लबची स्थापना केली. सध्या असे २५ क्लब कार्यरत आहेत. प्रत्येक क्लबमध्ये दररोज सकाळी १ तास हास्य योग केला जातो. त्यामध्ये पहिली ४५ मिनिटे योगा आणि नंतरची १५ ते २० मिनिटे हास्याचे प्रकार. हास्याचे सुमारे ६० ते ७० प्रकार आहेत. यामुळे चेहºयाच्या सर्व अवयवांना व्यायाम मिळतो. चेहरा दिवसभर टवटवीत राहतो. वयाच्या मानाने माणूस तरूण दिसू लागतो. योगामुळे प्रकृती तर चांगली राहतेच शिवाय दिवसभर शरीरात उत्साह, जोम असतो. या हास्ययोगाचे फायदे सांगायचे झाल्यास रक्तदाब, मधुमेह, अस्थमा, मणक्याचे विकार, दमा, फुफ्फुसाचे विकार कमी होतात. शरीरातील पांढºया पेशींचे प्रमाण वाढते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजार आपल्यापासून दूर राहतात. वरील विकार कमी झाल्याचे हास्यक्लबमधील सदस्य स्वानुभवाने सांगतात. डॉ. दिलीप शहा यांच्या कुटुंबात अनुवंशिक मधुमेह आहे. त्यामुळे या आजारापासून आपल्याला दूर रहायचे असेल तर आपण हास्ययोगाचा आधार घ्यायला हवा, असे वाटल्याने डॉ. शहा यांनी वयाच्या ४६व्या वर्षांपासून हास्ययोगाला सुरुवात केली. कोल्हापुरात हास्ययोग रुजविला. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी आता हास्ययोग सुरू झाले आहेत. डॉ. शहा यांचे वय आज ६६ आहे. अद्याप मधुमेह त्यांच्या जवळपासही फिरकला नाही, असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. निवृत्तीनंतर किंवा साठीनंतर ज्येष्ठ नागरिक हे बिरूद चिकटते. एकत्र कुटुंब असेल तर फारशी समस्या उद्भवत नाही. मात्र, मुले-मुली नोकरी करत असतील तर अशा ज्येष्ठांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळत नाही. तशातच वेगवेगळे आजार त्यांच्याजवळ येत असतात. काहीसे एकाकीपणही वाट्याला येते. यावरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वत:चे आरोग्य चांगले ठेवणे. माणसात मिसळणे. त्यासाठी हास्य क्लब ही एक योग्य जागा आहे. तेथे कसलेही पैसे द्यावे लागत नाहीत. समवयस्क एकत्रित आल्यामुळे व्यायाम, हास्ययोग उत्साहात केले जातात. अगदी कधीही नृत्य, गायन न करणारेही हास्य क्लबमध्ये दररोज सकाळी हसत, गात-नाचत असतात. संपूर्ण कोल्हापूर स्वच्छ, सुंदर आणि हसरं व्हावं, आरोग्यदायी रहावं असे आपले स्वप्न आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे डॉ. दिलीप शहा सांगतात. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होवो.(लेखक ‘लोकमत’चे उपवृत्त संपादक आहेत.)kollokmatpratisad@gmail.com