हसरं कोल्हापूर...!-- दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:18 AM2018-05-08T00:18:19+5:302018-05-08T00:18:19+5:30

 Hasser Kolhapur ...! - Look | हसरं कोल्हापूर...!-- दृष्टीक्षेप

हसरं कोल्हापूर...!-- दृष्टीक्षेप

Next

-चंद्रकांत कित्तुरे
रविवारी जगभरात जागतिक हास्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोल्हापुरातही तो राजर्षी छत्रपती शाहू हास्ययोग परिवाराच्या नेतृत्वाखाली २५ हास्यक्लबनी एकत्रितपणे साजरा केला. यानिमित्त स्वच्छ, सुंदर आणि हसऱ्या निरोगी कोल्हापूरची स्वप्नं साकार करण्यासाठी हास्ययोगाचा प्रचार आणि प्रसार गल्लोगल्ली करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत हसायला वेळ आहे कुणाला? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. कारण दैनंदिन जीवनात आपण इतके गुंतून गेलेलो असतो की व्यायामासाठी, आरोग्यासाठी आपल्याला वेळच नसतो, असे सांगणारे अनेकजण भेटतात. यातूनही खास आरोग्याकडे लक्ष देणारे, नियमित फिरायला जाणे, व्यायाम करणे, योगा करणे किंवा जीममध्ये जाणे असे करणारेही अनेकजण आहेत. पण तुलनेने त्यांचे प्रमाण कमी दिसते. आरोग्यासाठी हास्य किती गरजेचे आहे, हे हसणाºया व्यक्तीलाच कळू शकते. सदैव स्वत:च्या विचारात दुर्मुखलेल्या चेहºयाने दैनंदिन जीवन रेटणाºयांना ते कसे कळणार? ठिकठिकाणचे हास्य क्लब हे त्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि न हसणाºयांनाही हसायला लावत आहेत. कोल्हापुरात २० मे १९९८ साली त्र्यंबोली हास्य क्लबची स्थापना डॉ. दिलीप शहा आणि त्यांच्या सहकाºयांनी केली. योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे मार्गदर्शन त्यांना त्यासाठी लाभले. कोल्हापुरातील हा पहिला हास्यक्लब. त्यानंतर हास्य योगाचे महत्त्व लक्षात येईल तसे हळूहळू शहरातील प्रत्येक बागेमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन हास्य क्लबची स्थापना केली. सध्या असे २५ क्लब कार्यरत आहेत. प्रत्येक क्लबमध्ये दररोज सकाळी १ तास हास्य योग केला जातो. त्यामध्ये पहिली ४५ मिनिटे योगा आणि नंतरची १५ ते २० मिनिटे हास्याचे प्रकार. हास्याचे सुमारे ६० ते ७० प्रकार आहेत. यामुळे चेहºयाच्या सर्व अवयवांना व्यायाम मिळतो. चेहरा दिवसभर टवटवीत राहतो. वयाच्या मानाने माणूस तरूण दिसू लागतो. योगामुळे प्रकृती तर चांगली राहतेच शिवाय दिवसभर शरीरात उत्साह, जोम असतो. या हास्ययोगाचे फायदे सांगायचे झाल्यास रक्तदाब, मधुमेह, अस्थमा, मणक्याचे विकार, दमा, फुफ्फुसाचे विकार कमी होतात. शरीरातील पांढºया पेशींचे प्रमाण वाढते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजार आपल्यापासून दूर राहतात. वरील विकार कमी झाल्याचे हास्यक्लबमधील सदस्य स्वानुभवाने सांगतात. डॉ. दिलीप शहा यांच्या कुटुंबात अनुवंशिक मधुमेह आहे. त्यामुळे या आजारापासून आपल्याला दूर रहायचे असेल तर आपण हास्ययोगाचा आधार घ्यायला हवा, असे वाटल्याने डॉ. शहा यांनी वयाच्या ४६व्या वर्षांपासून हास्ययोगाला सुरुवात केली. कोल्हापुरात हास्ययोग रुजविला. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी आता हास्ययोग सुरू झाले आहेत. डॉ. शहा यांचे वय आज ६६ आहे. अद्याप मधुमेह त्यांच्या जवळपासही फिरकला नाही, असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. निवृत्तीनंतर किंवा साठीनंतर ज्येष्ठ नागरिक हे बिरूद चिकटते. एकत्र कुटुंब असेल तर फारशी समस्या उद्भवत नाही. मात्र, मुले-मुली नोकरी करत असतील तर अशा ज्येष्ठांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळत नाही. तशातच वेगवेगळे आजार त्यांच्याजवळ येत असतात. काहीसे एकाकीपणही वाट्याला येते. यावरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वत:चे आरोग्य चांगले ठेवणे. माणसात मिसळणे. त्यासाठी हास्य क्लब ही एक योग्य जागा आहे. तेथे कसलेही पैसे द्यावे लागत नाहीत. समवयस्क एकत्रित आल्यामुळे व्यायाम, हास्ययोग उत्साहात केले जातात. अगदी कधीही नृत्य, गायन न करणारेही हास्य क्लबमध्ये दररोज सकाळी हसत, गात-नाचत असतात. संपूर्ण कोल्हापूर स्वच्छ, सुंदर आणि हसरं व्हावं, आरोग्यदायी रहावं असे आपले स्वप्न आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे डॉ. दिलीप शहा सांगतात. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होवो.

(लेखक ‘लोकमत’चे उपवृत्त संपादक आहेत.)
kollokmatpratisad@gmail.com

 

Web Title:  Hasser Kolhapur ...! - Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.