बेळगाव : हेस्कॉमचे ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता टी. बी. मजगी यांना माळमारुती पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातून बुधवारी (दि. ४) सायंकाळी अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हेस्कॉम कार्यालयात सेवा बजावणाऱ्या २७ वर्षीय सहायक अभियंता बी. व्ही. सिंधू यांनी मजगी यांच्याकडून छळ होत असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ३०६ आर /डब्ल्यू ५११ आय पी सी कलमाखाली मजगी यांना अटक केली. यापूर्वी सिंधू यांनी मजगी आणि अन्य दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. पोलिसांनी तेव्हा मजगी आणि अन्य दोघांना अटक केली होती; पण ते तिघेही जामिनावर सुटले होते. २९ जानेवारीला सिंधू यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यास अटक; विनयभंग, छळाचे प्रकरण
By admin | Updated: February 5, 2015 00:13 IST