शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

हसीना फरास यांचा डिसेंबरमध्ये राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:31 IST

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या समझोत्यानुसार राष्ट्रवादीच्या विद्यमान महापौर हसीना फरास यांची महापौरपदाची मुदत संपत आल्याने त्या ८ डिसेंबरला राजीनामा देण्याची शक्यता आहे. गेले महिनाभर काँग्रेसच्या गोटात महापौरपदासाठी जोरदार हालचाली सुरू असून काँग्रेसतर्फे नगरसेविका दीपा मगदूम, स्वाती यवलुजे व उमा बनछोडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत, पण ...

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या समझोत्यानुसार राष्ट्रवादीच्या विद्यमान महापौर हसीना फरास यांची महापौरपदाची मुदत संपत आल्याने त्या ८ डिसेंबरला राजीनामा देण्याची शक्यता आहे. गेले महिनाभर काँग्रेसच्या गोटात महापौरपदासाठी जोरदार हालचाली सुरू असून काँग्रेसतर्फे नगरसेविका दीपा मगदूम, स्वाती यवलुजे व उमा बनछोडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत, पण मगदूम व यवलुजे यांच्यापैकी एकाला संधी मिळणार हे निश्चित आहे. त्यापुढील सहा महिनेही काँग्रेसचा महापौर राहणार आहे.महापालिकेच्या सन २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवत सर्वाधिक २७ जागा जिंकल्या होत्या. दोन अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ २९ वर पोहोचले होते. राष्टÑवादी काँग्रेसच्या साथीने काँग्रेसने पुन्हा महापालिकेत सत्ता स्थापन केली. आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार महापौर, उपमहापौरपदासह विषय समित्यांच्या सभापतिपदांच्या वाटण्या झालेल्या आहेत. त्यानुसार पहिल्या वर्षी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे यांना महापौरपदी तर उपमहापौरपदी शमा मुल्ला यांना संधी देण्यात आली. दुसºया वर्षी राष्टÑवादीच्या हसिना फरास महापौर तर काँग्रेस अर्जुन माने उपमहापौर झाले. फरास यांचा वर्षाचा कार्यकाळ संपत आल्याने नवीन महापौर निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.महापौरपदासाठी काँग्रेसकडून दीपा मगदूम, स्वाती यवलुजे, उमा बनछोडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसच्या गोट्यात पहिल्या वर्षी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अश्विनी रामाणे यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे आता उत्तर विधानसभा मतदारसंघाला संधी मिळू शकते. त्यादृष्टीने यवलुजे यांनी प्र्रयत्न सुरू केले आहेत; पण ‘उत्तर’मधून ऋतुराज पाटील यांची चाचपणी सुरू असल्याने आता मगदूम यांना संधी देऊन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘उत्तर’मधील नगरसेविकांना संधी देण्याची खेळी आमदार सतेज पाटील खेळू शकतात.नवीन महापौरांना साडेचार महिनेचविद्यमान महापौरांनी ८ डिसेंबरला राजीनामा दिला तरी नवीन निवड होण्यास किमान तीन आठवड्यांचा कालावधी जाणार आहे. साधारणत: मे महिन्यात नवीन आरक्षणानुसार सर्वसाधारण गटातील महिला महापौरपदी विराजमान होणार असल्याने आता होणाºया महापौरांना जेमतेम साडेचार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.भाजप-ताराराणीच्या सावध हालचालीस्थायी समिती सभापती निवडीवेळी भाजप-ताराराणी आघाडीने दोन्ही काँग्रेसची चांगलीच दमछाक केली होती पण ऐनवेळी शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले यांनी काँग्रेसला साथ दिल्याने डॉ. संदीप नेजदार यांनी बाजी मारली. त्यामुळे महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजप-ताराराणीमध्ये सावध हालचाली सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :Politicsराजकारण