राजाराम लोंढे
कोल्हापूर : लाडकी बहीण ही लोकप्रिय योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सुरू केली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याला पैसे देताना अर्थ विभागाची ओढाताण होते. त्याचा कमी-अधिक परिणाम सर्वच विभागांवर झाला आहे, हे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी समजून घेतले पाहिजे. नाहीतर लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय आभाळातून पैसे आणणार आहेत का...? असा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी साेमवारी कोल्हापुरात लगावला.
मंत्री शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभागाचे ४०० कोटी महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग केल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर टीका केली होती. याबाबत, बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, संजय शिरसाट हे माझे चांगले मित्र आहेत, ते नव्यानेच मंत्री झाल्याने त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेणे अपेक्षित आहे. माहिती न घेता ज्येष्ठ नेत्यांवर बोलणे चुकीचे आहे.
अलमट्टीबाबत...
कर्नाटक सरकारच्या हालचाली पाहिल्यानंतरच केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा केल्यानंतरच अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास स्थगिती दिलेली आहे. यापुढेही उंची वाढणार नाही, याची काळजी घेऊ, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.