शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर हसन मुश्रीफांची स्वप्नपूर्ती, मिळाले कोल्हापूरचे पालकमंत्रीपद 

By समीर देशपांडे | Updated: October 4, 2023 14:19 IST

चंद्रकांत पाटील पालकमंत्री न झाल्याने भाजपचे कार्यकर्ते नाराज

कोल्हापूर: अपवादात्मक काळ वगळता गेली २५ वर्षे मंत्रीपदावर असतानाही जे शक्य झाले नाही ते भाजप आणि शिंदे गटासोबत गेल्यानंतर हसन मुश्रीफ यांना शक्य झाले असून कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळाल्याने त्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे. मात्र चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री न झाल्याने भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले.मंत्री मुश्रीफ यांनी याआधी कामगार, पाटबंधारे विभागाचे कॅबिनेट मंत्रीपद भूषवले होते. २०१९ ला राज्यात सत्तांतर झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकास मंत्रीपद आले. त्याचवेळी कोल्हापूरचे पालकमंत्रीपद आपल्याला मिळावे अशी मुश्रीफ यांची इच्छा होती. ती त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. परंतू जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याला पालकमंत्रीपद या न्यायाने सतेज पाटील हे पालकमंत्री झाले. त्यानंतर पुन्हा २०२२ मध्ये सत्तांतर झाले. अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आणि मुश्रीफ यांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या. अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद हवे असेल तर चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर द्यावे लागेल हा हिशोब चुकवत भाजपने चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी टाकली आणि मुश्रीफ यांचे स्वप्न सत्त्यात उतरले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफguardian ministerपालक मंत्री