शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

हसन मुश्रीफांनी जनतेकडे मागितली १४ दिवसांची रजा, निवासस्थानाबाहेर लावलेल्या फलकाची कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा

By समीर देशपांडे | Updated: May 8, 2024 17:09 IST

कोल्हापूर : महायुतीच्या जिल्ह्यातील संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या विजयासाठी गेले महिनाभर राबत असलेले राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ...

कोल्हापूर : महायुतीच्या जिल्ह्यातील संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या विजयासाठी गेले महिनाभर राबत असलेले राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ श्रमपरिहारासाठी १४ दिवसांच्या इटली, स्पेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी जनतेकडे १४ दिवसांची रजा मागितली असून तसा फलकही निवासस्थानाबाहेर लावला आहे. मुश्रीफ यांच्या या ‘१४ दिवसांच्या’ रजेची आता जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून मुश्रीफ यांची ओळख आहे. वैविध्यपूर्ण कल्पना राबवत जनमानसावर आपला प्रभाव पाडण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे. ते कधी गांधी टोपी घालतात तर कधी कपाळाला बुक्का लावून हातात वीणा घेतात. कधी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हेलिकॉप्टरने गणपती आणतात तर कधी बुलेटवरून फेरी मारतात. आता लोकसभेसाठी मंगळवारी मतदान झाल्यानंतर मुश्रीफ यांनी या १४ दिवसांच्या रजेचा फलक लावला आहे.त्यामध्ये त्यांनी आता महिनाभर आचारसंहिता संपेपर्यंत विविध वैयक्तिक कामांना मर्यादा आहेत. या दरम्यान १४ दिवस मी रजेवर जात असून त्यासाठी परवानगी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभारही मानले आहेत. या दरम्यान आपला फोन सुरू असून भारतीय प्रमाणवेळेनुसार तेथील वेळ ही साडे तीन तास उशिरा असते. त्यामुळे अत्यावश्यकच असेल तर फोन केला तरी चालू शकेल असेही त्यांनी यामध्ये लिहले आहे. आरोग्य सेवेबाबत निवासस्थानी माझे लोक भेटतील व मुंबईची सेवाही सुरू राहिल असेही त्यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफ