शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

हेरवाडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:31 IST

कुरूंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील संजय भगवान गोंधळी (वय ४२) या शेतकºयाने कर्जास कंटाळून रामलिंग डोंगर (ता. हातकणंगले) येथे मंगळवारी (दि.२) रात्री विष पिऊन आत्महत्या केली.संजय गोंधळी यांची हेरवाड येथे दीड एकर शेती आहे. पत्नी, दोन मुले व आईसोबत कौलारू घरात राहतात. शेतात ऊस पीकच असल्याने व उत्पादन खर्च ...

कुरूंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील संजय भगवान गोंधळी (वय ४२) या शेतकºयाने कर्जास कंटाळून रामलिंग डोंगर (ता. हातकणंगले) येथे मंगळवारी (दि.२) रात्री विष पिऊन आत्महत्या केली.संजय गोंधळी यांची हेरवाड येथे दीड एकर शेती आहे. पत्नी, दोन मुले व आईसोबत कौलारू घरात राहतात. शेतात ऊस पीकच असल्याने व उत्पादन खर्च वाढल्याने शेती तोट्यातच होती. यातून त्यांनी २० गुंठे शेती दीड लाख रुपयांवर गहाणवट ठेवली आहे. एक एकर शेतीवर गावातील सेवा सोसायटीचे ९६ हजार, बॅँकेचे ५० हजार, बचतगटाचे ३० हजार याशिवाय हातउसने असे सुमारे चार लाखापर्यंत कर्ज होते.हे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत काही दिवस संजय अस्वस्थ होते. सोमवारी (दि. १ आॅक्टोबर) ते मोटारसायकल घेऊन घरातून बाहेर पडले होते. मंगळवारी (दि.२) रात्री रामलिंग डोंगरावर विष पिऊन त्यांनी आत्महत्या केली.पंधरा दिवसांपूर्वीच चिपरी (ता. शिरोळ) येथील तरुण शेतकरी राजेंद्र जिन्नाप्पा कोरे (३६) यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केली होती. शिरोळ तालुका सधन असूनही शेतीच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी बनत आहेत. शासनाच्या चुकीच्या कृषी धोरणाविरुद्ध शेतकºयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.उसाला चांगला दर मिळत असला तरी उत्पादनखर्च वाढला आहे. त्यामुळे ऊस शेतीही तोट्यात आहे. फळे, फुले, भाजीपाला, फळभाज्यांनाही दर नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत अडकत आहे. यातूनच शिरोळ तालुक्यातील शेतकरी आत्महत्या करीत असून, आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे शासनाने कर्ज माफ करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व कुटुंबाची जबाबदारी घ्यावी.- बंडू पाटील, तालुकाध्यक्ष,स्वाभिमानी युवा आघाडी.