शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘हरळी’ची लेक : ‘दुर्मीळ’ आजाराने त्रस्त, पोटासाठी मोलमजुरी करीत कुटुंब राहतेय गोव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:46 IST

‘गुड पाश्चर सिंड्रोम’ हा जगात अतिशय दुर्मीळ मानला जाणारा आजार जडलेल्या गडहिंग्लजच्या लेकीला दानशुरांच्या मदतीची गरज आहे. मूळचे गडहिंग्लज तालुक्यात हरळी येथील तिचे आई-वडील पोटासाठी गोव्यात मोलमजुरी

राम मगदूम।गडहिंग्लज : ‘गुड पाश्चर सिंड्रोम’ हा जगात अतिशय दुर्मीळ मानला जाणारा आजार जडलेल्या गडहिंग्लजच्या लेकीला दानशुरांच्या मदतीची गरज आहे. मूळचे गडहिंग्लज तालुक्यात हरळी येथील तिचे आई-वडील पोटासाठी गोव्यात मोलमजुरी करीत आहेत. गरिबीमुळे मुलीच्या उपचाराचा लक्षावधीचा खर्च पेलणे त्यांनाकेवळ अशक्य आहे. म्हणूनच गोव्यातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असलेल्या ९ वर्षीय संस्कृतीला दानशुरांच्या मदतीचीही गरज आहे.

हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) येथील सुधाकर सत्याप्पा कांबळे यांचे कुटुंबीय गेल्या ५० वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी गोव्यातील पेडणे नजीकच्या तुये गावात वास्तव्यास आहेत. त्यांच्यावर वयोवृद्ध आई-वडिलांसह पत्नी व तीन मुलांच्या संगोपनाचा भार आहे. ‘संस्कृती’ ही त्यांची द्वितीय कन्या असून,ती तुये येथील डॉन बास्को हायस्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिकत आहे.दरम्यान, मार्च २०१८ मध्ये वार्षिक परीक्षेला जाताना चक्कर आलीआणि उलट्या सुरू झाल्या. अनेक दवाखान्यात दाखवूनही तिलाबरे न वाटल्यामुळे तिला जिल्हा रूग्णालयात आणि तेथून गोवा मेडीकल कॉलेजच्या रूग्णालयात पाठविण्यात आले.त्याठिकाणी अनेक चाचण्या होऊनही तिच्या आजाराने निदान झाले नाही. त्यामुळे तिच्या किडनीचा छोटासा भाग मणीपाल येथील दवाखान्यात पाठविण्यात आला. तेथील तपासणी अहवालात तिला हा दुर्धर आजार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिच्यावर जुने गोवे येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.देशातील २५ वी रूग्ण‘गुड पाश्चर सिंड्रोम’ हा आजार लाखामध्ये एकाला होतो. हा आजार जडलेली संस्कृती ही गोव्यातील पहिली तर देशातील २५ वी रूग्ण आहे. तिच्यावर सध्या जुने गोवे येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. आजपर्यंच्या उपचाराचे बिल सुमारे ४ लाख इतके झाले असून स्थानिक वृत्तपत्रातील बातम्या आणि सोशल मीडियावरील आवाहनामुळे काही दानशुरांनी दिलेल्या मदतीतून तो खर्च भागविण्यात आला आहे.किडनी बदलावी लागणारतीन महिन्यांच्या उपचारात तिच्या किडनींनी साथ न दिल्यास तिच्या किडन्या बदलाव्या लागणार आहेत. त्यासाठी किमान ३० लाखांचा खर्च येईल, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. संस्कृतीच्या उपचारासाठी गेल्या तीन-चार महिन्यांपासून दवाखान्याचे हेलपाटे सुरू झाल्यामुळे तिच्या वडिलांना कामावर जाता आलेले नाही. सध्या दिवसाआड तिच्यावर ‘डायलेसीस’ सुरू असून, वारंवार कराव्या लागणाऱ्या महागड्या तपासण्यांमुळे तिचे कुटुंबीय मेटाकुटीला आले आहेत.आरोग्य मंत्र्यांना वडिलांचे साकडेपंडित दीनदयाळ उपाध्याय आरोग्य विमा योजनेतून ‘संस्कृती’च्या उपचारार्थ केवळ ४० हजार २५० रूपये इतकीच रक्कम मंजूर झाली आहे. आपली आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने करावा, अशी विनंती तिचे वडील सुधाकर यांनी गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे.