शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात हापूस आले रे....!  एका आंब्याला तब्बल ६२५ रुपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:06 IST

Mango Hapus Kolhapur Market News- कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत फळांचा राजा हापूसची आवक झाली आहे. आज (गुरूवारी) इब्राहिमभाई बागवान व इकबाल बागवान यांच्या दुकानात सौदा काढलेल्या सौद्यात एका हापूस आंब्याला तब्बल ६२५ रुपये दर, तर चार डझनच्या पेटीला ३० हजार भाव मिळाला.

ठळक मुद्देकोल्हापूरात हापूस आले रे....!  एका आंब्याला तब्बल ६२५ रुपये दर चार डझनच्या पेटीला ३० हजार भाव

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत फळांचा राजा हापूसची आवक झाली आहे. आज (गुरूवारी) इब्राहिमभाई बागवान व इकबाल बागवान यांच्या दुकानात काढलेल्या सौद्यात एका हापूस आंब्याला तब्बल ६२५ रुपये दर, तर चार डझनच्या पेटीला ३० हजार भाव मिळाला.यंदा परतीचा लांबलेला पाऊस, त्यानंतर अवकाळीने झोडपल्याने आंब्याचा हंगाम लांबणीवर पडतो की काय? असे वाटत होते. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हापूस आंब्याची आवक कोल्हापुरात सुरू झाली आहे. आवक कमी असली तरी वेळेत हंगाम सुरू झाला आहे.

कोल्हापूर बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये बुधवारी इब्राहिमभाई बागवान यांच्या अडत दुकानात भाई आयरेकर (देवगड) यांचे १५ हापूस बॉक्स तर इकबाल बागवान यांच्या दुकानात सचिन गोवेकर (कुंभारमठ, मालवण) यांची एक हापूस पेटी व वासुदेव चव्हाण (देवगड) यांच्या एक हापूस पेटीची आवक झाली. सौद्यात एका हापूस आंब्याला तब्बल ६२५ रुपये दर, चार डझनच्या पेटीला २५ हजार, तर ६ डझनच्या पेटीला ३० हजार भाव मिळाला.

बाजार समितीत इब्राहिम आबाभाई बागवान या व्यापाऱ्याच्या ६ नं गाळा येथे झालेल्या सौद्यात देवगडचा शेतकरी योगेश लक्ष्मण आचरेकर यांच्या हापूस आंब्याला मोठा भाव मिळाला. जयवंत कृष्णात वळंजु यांनी एक डझन हापूस ७००० रुपये,तर  हाशिम गूलाबसाब बागवान यांनी १५ नग हापूस आंबा ५००० रुपये दराने विकत घेतला. 

संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ व बाजार समिती अशासकीय मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते आंब्या सौदा आज (गुरूवारी) सकाळी दहा वाजता झाला. यावेळी बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील, अडते, खरेदीदार, शेतकरी व बाजार समितीशी संबधित उपस्थित होते.

टॅग्स :Mangoआंबाkolhapurकोल्हापूरMarketबाजार