कोल्हापूर : सनई-चौघड्याचा मंजूळ स्वर, इंद्रधनुषी रांगोळीचा गालिचा, तुतारीचा निनाद आणि वाचकांचा लाभलेला उदंड प्रतिसाद, अशा अविस्मरणीय वातावरणात आज, बुधवारी ‘लोकमत’चा दशकपूर्ती वर्धापनदिन उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवर, कोल्हापूरकरांनी वरूणराजाच्या साक्षीने ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘जिथे मराठी, तेथे लोकमत’ या ब्रीदवाक्यानुसार वाटचाल करत महाराष्ट्राचा मानबिंदू बनलेल्या ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीचा दशकपूर्ती वर्धापनदिन ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद सांस्कृतिक सभागृहात झाला. स्नेहमेळाव्याचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांचे प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, दळवीज् आर्टस् इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी, चित्रकार विजय टिपुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अल्पावधीत रांगड्या कोल्हापूरकरांशी आपुलकीचे नाते निर्माण करणाऱ्या आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेचे व्रत जपणाऱ्या ‘लोकमत’च्या असंख्य वाचकांनी स्नेहमेळाव्यास उत्स्फूर्त उपस्थिती लावली. सायंकाळी पाच वाजल्यापासूनच वाचकांची गर्दी झाली होती. सर्वांचे स्वागत ‘लोकमत सखी मंच’च्या सदस्या गुलाबपुष्प व पेढा देऊन करत होत्या. मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘लोकमत’ परिवारातील सदस्य आणि भालदार-चोपदारांकडून येणाऱ्यांचे शाही स्वागत होत होते. रात्री दहा वाजेपर्यंत वाचकांच्या गर्दीचा ओघ कायम होता. रंगीबेरंगी फुलांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने सजलेल्या रंगमंचावर उभे राहून ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. शुभेच्छा देण्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार महादेवराव महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार पी. एन. पाटील, संजय घाटगे, संपतराव पवार-पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा, शहर पोलीस अधीक्षक भारतकुमार राणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उदय आफळे, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, दीनानाथसिंह, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे. एफ. पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. ज. रा. दाभोळे, ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव, विजयमाला मेस्त्री, आशालता मेस्त्री, चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, शाहीर राजू राऊत, ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, सरोज पाटील, मेघा पानसरे, उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, सत्यजित कदम, गटनेता राजेश लाटकर, शिक्षण समिती सभापती संजय मोहिते, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव, माजी महापौर सागर चव्हाण, सुनीता राऊत, जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उमेश आपटे, उपजिल्हाधिकारी दीपक नलवडे, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे, ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी अशोक पाटील, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विभागीय माहिती उपसंचालक वर्षा शेडगे, ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके, विश्वास पाटील, अरुणकुमार डोंगळे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, ‘मुक्त’ विद्यापीठाचे विभागीय संचालक एस. एस. चौगुले, जनता दलाचे राज्य महासचिव शिवाजीराव परुळेकर, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, ‘गोशिमा’चे अध्यक्ष उदय दुधाणे, उद्योजक दिलीप मोहिते, आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)आर. आर. पाटील, पतंगराव कदम यांच्या शुभेच्छागृहमंत्री आर. आर. पाटील, तसेच वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मंत्रालयातून दूरध्वनीवरून कोल्हापूर उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांच्यामार्फत आपल्या खास शैलीत ‘लोकमत’ला वर्धापनदिनाच्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव
By admin | Updated: August 21, 2014 00:51 IST