शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

जिल्ह्यात विविध ठिकाणी बकरी ईद उत्साहात-- मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 01:06 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लजसह विविध ठिकाणी बकरी ईद उत्साहात साजरी केली. यावेळी दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

ठळक मुद्दे: नमाज पठणासह दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, शिर-खुर्म्याचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लजसह विविध ठिकाणी बकरी ईद उत्साहात साजरी केली. यावेळी दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.सुखशांतीसाठी प्रार्थनाबकरी ईद (ईद उल अजहा) कोल्हापुरात सर्वधर्मीयांनी मिळून शनिवारी उत्साहात साजरी केली. यावेळी सर्वांनी मिळून कोल्हापूरची व देशाची एकात्मता तसेच सुखशांती अबाधित राहावी याकरिता प्रार्थना केली. यानंतर सर्वांना शिर-खुर्म्याचे वाटप केले. दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर नमाज पठण करण्यात आले. यावेळी सर्व धर्मीयांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. कोल्हापूर शहरात दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगसह खाटीक मस्जिद, कब्रस्तान, बडी मस्जिद, नंगीवली ईदगाह, गवंडी मस्जिद, उत्तरेश्वर पेठ मस्जिद, तसेच लाईनबझार, कदमवाडी, बाबुजमाल, बाराईमाम, अकबर मोहल्ला, सरनाईक वसाहत, आदी ४५ मस्जिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी सकाळी नमाज पठण केले. यावेळी एकमेकाला आलिंगन देत शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बोर्डिंग येथे सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पटांगणावर पहिल्या जमातीकरिता मुफ्ती इरशाद कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व नमाज पठण केले. दुसºया जमातच्या नमाजाकरिता हाफीज आकिब म्हालदार व तिसरी जमातसाठी मौलाना रहिमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केले. मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, साजिद खान, मलिक बागवान, हमेजाखान शिंदी, रफिक मुल्ला, बापुसो मुल्ला, नौशाद मोमीन, गुलाब सनदी, सलीम बागवान, यासिन उस्ताद, इकबाल धारवाडकर, आदी उपस्थित होते. नमाज पठणनंतर मुस्लिम बांधवांनी मुस्लिम बोर्डिंग येथे मद्रसा व मस्जिदसाठी आलेल्या गरजूंना आर्थिक मदत केली. याठिकाणी ईदच्या शुभेच्या देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत, सर्वधर्मीय उपस्थित होते.इचलकरंजीत सामूहिक नमाज पठणइचलकरंजी : शहर परिसरात बकरी ईद उत्साहात साजरी केली. येथील स्टेशन रोडवरील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. इचलकरंजीतील ईदगाह मैदानावर हजरत सय्यद मख्तुमवली दर्गा आणि ईदगाह ट्रस्ट यांच्यावतीने बकरी ईदनिमित्त सामूहिक नमाज पठणाचे आयोजन केले होते. रुहानी मस्जिदचे इमाम मुफ्ती डिग्रोज चाँदकोटी यांनी बयान पठण, तर विक्रमनगर मशिदीचे इमाम कारी अश्पाक बागवान यांनी नमाज पठण केले. यावेळी विश्वशांतीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. नमाज पठणानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.लक्षतीर्थ वसाहतीत मुस्लिम बांधवांना मान्यवरांकडून शुभेच्छालक्षतीर्थ वसाहत : लक्षतीर्थ वसाहतीत मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्याने येथे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची दिवसभर गर्दी होती. येथे चाँदतारा मशीद, बडे मशीद, यशोदा मशीद असून, याठिकाणी दिवसभर मुस्लिम बांधवांना मराठा बांधवांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी उपमहापौर सचिन खेडकर, नगरसेवक राहुल माने, नगसेविका अनुराधा खेडकर, गणेश खाडे, राजू मोरे आदींनी शुभेच्छा दिल्या. इम्रान शेख, हासन मुजावर यांनी स्वागत केले.रक्तदान शिबिराचे आयोजनास उत्स्फूर्त प्रतिसादकोल्हापूर : येथील मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिर घेतले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे शिबिर सीपीआरमध्ये घेण्यात आले. यावेळी हिंदू व मुस्लिम बांधवांनी रक्तदान करून धार्मिक एकोप्याचा आदर्श दाखवून दिला. शिबिराचे उद्घाटन करवीर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता मंडले यांच्या हस्ते झाले. ‘बकरी ईद’निमित्त एक सामाजिक बांधीलकी या दृष्टीने व रक्तदानाचे महत्त्व आणि आवश्यकता याची जाण करून देण्यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी समितीचे नियाज अत्तार, शोएब अत्तार, प्रवीण खोत, इम्तियाज नायकवडी, सुरेश शिपूरकर, कृष्णात कोरे, राजवैभव कांबळे, पंकज खोत, नवनाथ मोरे, हर्षल जाधव, दत्तात्रय घोरुगडे, स्वातीकोरे, सीमा पाटील, सूरज नायकवडी, अमल मुलाणी, साहिल मुलाणी, आदी उपस्थित होते.हलकर्णीत मुस्लिम बांधवांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा!हलकर्णी : येथे मुस्लिम सुन्नत जमाअत व विविध तरुण मंडळाच्या सदस्यांनी बकरी ईद उत्साहात केली. यावेळी ईदगाह मैदानात सामुदायिक नमाजपठण केले. हाफीज महंमद मकानदार यांनी बकरी ईदचे महत्त्व सांगितले. सर्वांनी पावसासाठी प्रार्थना केली. मुस्लिम सुन्नत जमाअत अध्यक्ष अलिसो कादरभाई, सलीम यमकनमर्डी, हसन बाणदार, बाबासाहेब मकानदार, ईस्माईल यमकनमर्डी, अल्ताफ कडलगे, निजाम पानारी, जैनुल हट्टी, असिफ खलिफा, सादीक नगारसे यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.विश्वशांतीकरिता सामुदायिक प्रार्थनागडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्यात ‘बकरी ईद’ उत्साहात पार पडली. येथील ईदगाह मैदानावर सुमारे सात हजारांहून अधिक मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले.मौलाना नजमूल शेख यांनी नमाज व खुतबा पठण केले. यावेळी विश्वशांतीसाठी सामुदायिक प्रार्थना केली. पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस यांनी सर्वांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी सुन्नी जुम्मा मसजिदचे अध्यक्ष राजूभाई खलीफ, सचिव आशपाक मकानदार, एम. एस. बोजगर, घुडूसाहेब मुगळे, मंजूर मकानदार, आदी उपस्थित होते. युनूस नाईकवाडे यांनी आभार मानले.