शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
4
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
5
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
6
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
7
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
8
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
9
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
10
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
11
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
12
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
13
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
14
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
15
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
16
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
17
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
18
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
19
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
20
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

वर्धापनदिनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Updated: February 19, 2016 01:21 IST

मान्यवरांकडून शुभेच्छा : वाचकांशी ऋणानुबंध घट्ट करणाऱ्या स्नेहमेळाव्यास तुडुंब गर्दी

सांगली : हजारो दीपमाळांनी सजलेला मंडप... पुष्परचनेचा साज... सुंदर रांगोळ्यांनी होणारे स्वागत आणि उत्साहाला आलेले उधाण... अशा वातावरणात गुरुवारी ‘लोकमत’वर वर्धापन दिनानिमित्त स्नेहशुभेच्छांचा वर्षाव झाला. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, उद्योग, क्रीडा, शिक्षण यासह अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘लोकमत’ला शुभेच्छा दिल्या. वर्धापन दिनाचे औचित्य साधत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘स्मार्ट सांगली’ या विशेषांकाचेही वाचकांनी जोरदार स्वागत केले.गेली १७ वर्षे वाचकांच्या पाठबळावर सांगलीकरांच्या आशा- आकांक्षांची पूर्तता करीत ‘लोकमत’ने दमदार वाटचाल सुरू ठेवली आहे. गुरुवारी वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगली-माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजल्यापासून ‘लोकमत’ला शुभेच्छा देण्यासाठी याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, सांगली आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, निर्मिती विभागाचे उपसरव्यवस्थापक बाजीराव ढवळे, मनुष्यबळ व प्रशासन विभागाचे व्यवस्थापक संतोष साखरे यांनी ‘लोकमत’च्यावतीने शुभेच्छा स्वीकारल्या. प्रारंभी ज्येष्ठ राजकीय व सामाजिक विश्लेषक डॉ. विश्वंभर चौधरी यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी आमदार संभाजी पवार, माजी आमदार सदाशिवराव पाटील, काँग्रेस नेत्या जयश्रीताई मदन पाटील, महापौर हारूण शिकलगार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, महांकाली कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, आष्ट्याच्या नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जीवन पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद लाड, प्रदेश काँग्रेस सचिव सत्यजित देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, जिल्हा परिषद आरोग्य सभापती गजानन कोठावळे, पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, महापालिका आयुक्त अजिज कारचे, उपायुक्त सुनील नाईक, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता एम. जी. शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी अनिल कदम, मोहीम अधिकारी धनाजी पाटील, एसटी महामंडळाचे प्रभारी विभाग नियंत्रक अरुण वाघाटे, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक जे. के. महाडिक, चितळे डेअरीचे मकरंद चितळे, उद्योजक विजयकुमार माळी, मनोज भोसले, सांगली जिल्हा बँकेचे प्रभारी कार्यकारी संचालक बी. एम. रामदुर्ग, अशोका अ‍ॅग्री सोल्युशन पोखर्णीचे सतीश पाटील, डॉ. अनिल मडके, डॉ. मोहन पाटील, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, तेजस्विनी सूर्यवंशी, शिक्षक समितीचे राज्यनेते विश्वनाथ मिरजकर, शिक्षक संघाच्या थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)‘स्मार्ट सांगली’ : वाचकांकडून जोरदार स्वागत‘लोकमत’ वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘स्मार्ट सांगली’ या विशेषांकाचे वाचकांनी जोरदार स्वागत केले. या विशेषांकातील सर्वच लेख दर्जेदार झाल्याची प्रतिक्रियाही वाचकांतून उमटत होती. शुभेच्छापत्रांसह दूरध्वनी, सोशल मीडियावरूनही अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.