शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : खूप मजा आली... अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

हनुमान तरुण मंडळाचे ‘अग्निदिव्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:22 IST

सोंगी भजन, कीर्तन, शाहिरी अशा माध्यमांतून गावातील जुन्या-जाणत्या लोकांच्या कला पाहत असताना काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील हनुमान तरुण मंडळाच्या ...

सोंगी भजन, कीर्तन, शाहिरी अशा माध्यमांतून गावातील जुन्या-जाणत्या लोकांच्या कला पाहत असताना काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील हनुमान तरुण मंडळाच्या माध्यमातून नाटकाचे बीज रुजले. शहरात विविध ठिकाणी उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर, कामगारांतील कलाकारांच्या या मंडळाने महाराष्ट्रात आपल्या कलेचा ठसा उमटविला आहे. पारावरचे नाटक ते राज्यस्तरीय स्पर्धा, चित्रपटांपर्यंत उत्तुंग भरारी घेतली आहे.काळम्मावाडी येथील हनुमान तरुण मंडळाची स्थापना सन १९८५ मध्ये झाली. यातून शहरातील चहागाडी, सेंट्रिंग, विविध दुकानांमध्ये मजूर, कामगार म्हणून काम करणाºया गावातील काही कलाकारांना सोंगी भजन, कीर्तन, शाहिरीच्या माध्यमातून कलेच्या सादरीकरणाला संधी दिली.निर्माते व नाट्यलेखक सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या मंडळाने सन १९९२ मध्ये ‘अंधार’ नाटकाच्या माध्यमातून पहिल्यांदा राज्यनाट्य स्पर्धेत सादरीकरण केले. यानंतर धरणग्रस्तांचा सहभाग असलेले ‘धरणाखालच्या अंधारातून’, वगनाट्य ‘विच्छा’, ‘आषाढातील एक दिवस’ अशा नाटकांच्या स्पर्धा, तसेच व्यावसायिक ५० प्रयोग पूर्ण केले. ‘सासू ४२०’, ‘विठो रखुमाय’, आदी नाटकांच्या माध्यमातून हे मंडळ नावलौकिकास आले. मंडळाच्या वाटचालीत ‘कथा नामा जोग्याची’ ही एकांकिका टर्निंग पॉइंट ठरली. भालजी पेंढारकर स्मृती चषक स्पर्धेत सादर केलेल्या या एकांकिकेला वैयक्तिक पारितोषिकासह सांघिक उपविजेतेपद मिळाले. यानंतर या एकांकिकेने कोल्हापूर, इचलकरंजी, कणकवली, कोवाड, पुणे, आदी ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये बक्षिसांची लयलूट केली. या यशातून मंडळाने देवदासी, जोगता, तृतीयपंथी यांचे जीवन समजून घेत ‘कथा नामा जोग्याची’ नाटकाने राज्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यानंतर या नाटकावरच अवघ्या १३ दिवसांत चित्रपट साकारला. त्याला ‘झी गौरव’चे दोन पुरस्कार, विविध स्पर्धांमध्ये नामांकने मिळाली. मनोरंजनासह कौटुंबिक, सामाजिक सुधारणेची आठवण करून देणारे ‘वंदे मातरम्’ अर्थात ‘गोंधळ मांडियेला’ हे वग नाटक सादर केले. त्याला उत्कृष्ट प्रयोगासह लेखनाचे ‘झी’ कॉमेडी अवॉर्ड मिळाले. एकतर्फी प्रेमावरील ‘लव्ह इथले भयकारी’द्वारे राज्य स्पर्धा गाजविली.सामाजिक सुधारणेचे प्रणेते म्हणून प्रसिद्ध असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणी प्रस्तापितांच्या विरोधात खूप मोठा संघर्ष करावा लागला. या प्रकरणातील महाराजांचे विचार हे आजही आपल्या समाजासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. नाटकाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व परिवर्तन करण्याचा मानस असल्याचे हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील माने यांनी सांगितले.