रविवारी अर्जुन ऊर्फ अरुण चव्हाण आणि सुप्रिया चव्हाण या नवदाम्पत्याने या आजीला जीवनावश्यक वस्तू व आर्थिक स्वरूपात मदतीचा हात दिला. विशेष म्हणजे हे नवदाम्पत्य रविवारीच लग्नाच्या बोहल्यावर चढले आहे. मात्र, या आजीची व्यथा समजल्यानंतर त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या रेशीमगाठी बांधत आजीला मदत केली. आजीच्या नातवांचा शिक्षणाचा खर्च देण्याची ग्वाही माजी सरपंच एकनाथ माने यांनी दिली. यावेळी योगेश माने, विशाल पोवार, अनिल लांडगे, प्रकाश कापसे उपस्थित होते.
कुमार गुरबान, अमित कटारिया, पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन भोंगाळे, विराज डांगे, बजरंग हेबाळकर ,विजय मुंदाळे, आनंदा केरबा पाटील, एस. राजू माने, विकास यादव यांनीही मालुबाई सानप यांना मदतीचा हात दिला.
फोटो : २१ उजळाईवाडी मदत
ओळ:
नवदाम्पत्याने मालुबाई भुजाजी सानप या आजीला आर्थिक व वस्तूच्या स्वरूपात मदत दिली. यावेळी अर्जुन चव्हाण व सुप्रिया चव्हाण, माजी सरपंच एकनाथ माने, योगेश माने उपस्थित होते.